नवी दिल्ली: गुडगाव इथं तीन ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळातेय. हुडा सिटी मेट्रो स्टेशन, डीएलएफ व्यापारी केंद्र आणि सुशांत सेंटरमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती आहे. हा परिसर रिकामा करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान, मुंबईवर २६/११ रोजी करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद पुन्हा एकदा भारतावर दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचत असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे.
सेंट्रल इंटेलिजेन्स एजन्सी (सीआयए)च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार हाफिज सईदच्या रडारवर दिल्लीतील दोन हॉटेल्स आणि नवी दिल्ली-आग्रा हायवे रोड आहे. तसंच मेट्रो सुध्दा त्याच्या निशाण्यावर असल्याचं सांगण्यात आलंय.
देशातील सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. तसंच शहरातील शाळा आणि मॉल्सच्या परिसरातही सुरक्षा व्यवस्था कडक करण्याच्या सूचना राज्य सरकारांना देण्यात आल्या आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी प्रमुख पाहुणे म्हणून भारतात येणार आहेत. बराक ओबामा यांच्या आगमनाआधी दहशतवादी भारतात हल्ला करू शकतात यासाठी देशभरात कडक सुरक्षा ठेवण्याचे आदेश सुरक्षा यंत्रणांना देण्यात आले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.