सॉफ्ट ड्रिंकमध्ये आढळली मृत पाल, व्हिडिओ वायरल

वाढत्या गर्मीत तुम्ही घराबाहेर पडलात की मग थकलेल्या अवस्थेत सॉफ्ट ड्रिंक पित असाल... तर ही बातमी पाहिल्यानंतर तुम्ही सॉफ्ट ड्रिंक पिणंही बंद कराल.

Updated: May 28, 2016, 07:38 PM IST
सॉफ्ट ड्रिंकमध्ये आढळली मृत पाल, व्हिडिओ वायरल title=

चेन्नई : वाढत्या गर्मीत तुम्ही घराबाहेर पडलात की मग थकलेल्या अवस्थेत सॉफ्ट ड्रिंक पित असाल... तर ही बातमी पाहिल्यानंतर तुम्ही सॉफ्ट ड्रिंक पिणंही बंद कराल.

तामिळनाडूच्या धर्मापुरी शहरात सॉफ्ट ड्रिंकच्या एका बंद बाटलीत मृत पाल आढळली. हे पाहिल्यानंतर सगळ्यांना मोठा धक्का बसला. नागरिकांनी एकत्र येत दुकानदाराविरुद्ध तक्रार नोंदवली. 

खाद्य अधिकाऱ्यांनी ही बाटली आपल्या ताब्यात घेतलीय. पुढील तपास सुरू आहे.