www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
उत्तराखंडमध्ये आतापर्यंत ६२ ते ७० हजार भाविक अडकल्याची शक्यता केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी वर्तवलीय. पाच हजार भाविकांना सुखरुप वाचवण्यात यश आल्याचं शिंदेंनी माहिती दिलीय. बचाव कार्यसाठी आयटीबीटी मदत घेतल्याची माहितीही त्यांनी दिलीय. पुरात अडकलेल्या नागरिकांना ‘फूड पॅकेट्स’मधून खाद्यपदार्थ पोहचवण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
दरम्यान, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधीही उत्तराखंडचा दौरा करणार आहेत. यावेळी ते पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी करतील. पुरामुळे झालेलं नुकसान आणि परिस्थितीचा ते आढावा घेतील. दुसरीकडे प्रलयात अडकलेले नागरिक आणि केदारनाथच्या भाविकांच्या बचावकार्यासाठी लष्कराची मदत घेतली गेलीय. लष्करानं मदतकार्य सुरू केलंय.
२४ हेलिकॉप्टर्सच्या मदतीनं अडकलेल्या भाविकांना सोडवण्यात येणार आहे. शिवाय वायुसेनाही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावलीय. सुपर हरक्युलिक्सच्या मदतीनं वायुसेना बचावकार्य करणार आहे. दरम्यान, या प्रलयात अजूनही जवळजवळ ६२ हजार भाविक अडकले आहेत. तर शेकडो जण बेपत्ता आहेत. केदारनाथ मंदिराजवळ काही मृतदेह आढळल्याची माहिती आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.