'शनीप्रवेशामुळे वाढणार महिलांवरील बलात्काराच्या घटना

शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी शनी शिंगणापूरातील महिलांच्या मंदिर प्रवेशावर मोठा आक्षेप व्यक्त केलाय. इतकंच नाही, तर अशा प्रवेशामुळे महिलांवरच्या बलात्कारासारख्या घटनांत वाढ होणार असल्याची भविष्यवाणीही शंकराचार्यांनी करून टाकलीय. 

Updated: Apr 13, 2016, 02:07 PM IST
'शनीप्रवेशामुळे वाढणार महिलांवरील बलात्काराच्या घटना title=

नवी दिल्ली : शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी शनी शिंगणापूरातील महिलांच्या मंदिर प्रवेशावर मोठा आक्षेप व्यक्त केलाय. इतकंच नाही, तर अशा प्रवेशामुळे महिलांवरच्या बलात्कारासारख्या घटनांत वाढ होणार असल्याची भविष्यवाणीही शंकराचार्यांनी करून टाकलीय. 

हिंदुस्तान टाईम्सनं दिलेल्या बातमीनुसार, जेव्हापर्यंत महिला शनी पूजा बंद करणार नाहीत तोपर्यंत महिलांवर अत्याचार होतच राहतील... ही पूजा बंद करण्यात आली नाही तर या अत्याचारांच्या प्रमाणातही वाढ होत राहील, असं शंकराचार्यांनी म्हटलंय. 

शनी एक देव नाही तर गृह आहे आणि गृहाची शांती होते पूजा नाही, असंही शंकराचार्यांचं म्हणणं आहे. 

नायडू शंकराचार्यांशी असहमत

केंद्रीय मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्पती यांच्या या वक्तव्यावर आपला आक्षेप नोंदवलाय. 'शनी शिंगणापूरात मंदिरातमहिलांचा प्रवेश अशुभ असेल किंवा शिर्डीच्या साईबाबांच्या पूजेमुळे महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालीय, या स्वामी स्वरुपानंदांच्या विचारांशी मी असहमत आहे की' असं त्यांनी ट्विटरवर म्हटलंय.