भारतात बहुतेक धर्मनिरपेक्ष लोक हिंदूविरोधी - तस्लिमा

बांग्लादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी लेखकांच्या दुटप्पी भूमिकेवर निशाणा साधलाय. खोट्या धर्मनिरपेक्षतेवर निशाणा साधत तस्लिमानं 'वाढत्या असहिष्णुते'विरुद्ध लेखकांच्या विरोध-प्रदर्शनवर प्रश्न उपस्थित केलेत. 

Updated: Oct 17, 2015, 06:45 PM IST
भारतात बहुतेक धर्मनिरपेक्ष लोक हिंदूविरोधी - तस्लिमा title=

नवी दिल्ली : बांग्लादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी लेखकांच्या दुटप्पी भूमिकेवर निशाणा साधलाय. खोट्या धर्मनिरपेक्षतेवर निशाणा साधत तस्लिमानं 'वाढत्या असहिष्णुते'विरुद्ध लेखकांच्या विरोध-प्रदर्शनवर प्रश्न उपस्थित केलेत. 

'पश्चिम बंगालमध्ये जेव्हा माझ्या पुस्तकावर बंदी घालण्यात आली आणि माझ्याविरुद्ध पाच फतवेही जारी करण्यात आले तेव्हा अधिकरत लेखकांनी गप्प राहणंच पसंत केलं... इतकंच नाही, तर कीह लेखकांनी पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांना माझ्या पुस्तकावर बंदी घालण्याचीही मागणी केली' असं 'टाईम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत तस्लिमा यांनी म्हटलंय. 

'अधिकांश धर्मनिरपेक्ष लोक हिंदूविरोधी आहेत. ते हिंदू कट्टरपंथियांच्या कामांवर विरोध प्रदर्शन करतात पण मुस्लिम कट्टरपंथियांच्या घृणास्पद कारवायांचा मात्र बचाव करतात' असं धक्कादायक विधान त्यांनी केलंय. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणखीन सहानुभूतीसोबत बोलायला हवं, असं तुम्हाला वाटतं का? हा प्रश्न नसरिन यांना विचारण्यात आला तेव्हा, भारतातील राजनेते मतांसाठी लोकांना खुश ठेवतात. मुसलमानांना जास्त महत्त्व दिलं गेल्यानं अनेक हिंदू नाराज आहेत. हे खरं आहे की मुसलमानांना कधी कधी ते मुसलमान असल्यानं त्रास दिला जातो. परंतु, हेच इतर धर्माच्या लोकांच्या बाबतीतही होतं, असं तस्लिमा यांनी म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.