महिलेचे अल्पवयीन तरुणावर लैंगिक अत्याचार; पोलिसांनी केली अटक

मध्यप्रदेशच्या राजगड जिल्ह्यातील एका महिलेनं एका तरुणावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. आरोपी महिलेला अटक करण्यात आलीय. 

Updated: Oct 17, 2015, 05:03 PM IST
महिलेचे अल्पवयीन तरुणावर लैंगिक अत्याचार; पोलिसांनी केली अटक title=

राजगड : मध्यप्रदेशच्या राजगड जिल्ह्यातील एका महिलेनं एका तरुणावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. आरोपी महिलेला अटक करण्यात आलीय. 

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील झंझाडपुरा गावातील एका महिलेनं १६ वर्षांच्या एका अल्पवयीन तरुणावर जबरदस्ती केली. त्यानंतर या तरुणानं दोन महिन्यापर्यंत ही गोष्ट कुणालाही सांगितली नव्हती. 

परंतु, यानंतर त्याला आणखी एक धक्का बसला जेव्हा महिलेच्या पतीनं आणि सासरच्या लोकांनी अवैध संबंध बनवण्याच्या आरोपाखाली या तरुणाचंच अपहरण केलं. त्यांनी या तरुणाचं अपहरण करून त्याला १० दिवस बंधक बनवून ठेवलं आणि मारहाणही केली.

या तरुणाला आपल्या तावडीतून सोडण्यासाठी त्याच्या कुटुंबाकडे तब्बल १० लाखांची मागणी करण्यात आली. जेव्हा एवढी मोठी रक्कम देण्यात तरुणाचे कुटुंबीय अपयशी ठरले तेव्हा महिलेच्या सासरच्या लोकांनी या तरुणाला पोलिसांकडे घेऊन गेले. 

यावेळी, पोलिसांनी तरुणाची आणि महिलेची चौकशी केली... तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला. महिलेनंही आपल्या कृत्याची कबुली देत आपणच त्या तरुणावर जबरदस्ती केल्याचं म्हटलं.

यानंतर, पोलिसांनी महिला, तिचा पती आणि इतर तीन लोकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.