मुंबई : आता बाजारात दोन हजारांच्या नोटेची साडी आलीय.
सर्वसाधारणपणे गुलाबी हा महिलांच्या आवडीचा रंग... दोन हजारांची नोट गुलाबीच असल्यानं या नोटेची गुलाबी रंगाची साडी बाजारात आलीय.
सूरतमधल्या बाजारात सध्या अशा साड्या उपलब्ध आहेत. या साडीवर दोन हजाराच्या पाचशे चार नोटा प्रिंट करण्यात आल्यात... आणि ही साडी फक्त 160 रुपयांत मिळतेय. या साडीला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.