तीन तासांत प्रवास केला नाही तर रेल्वेचं तिकीट होणार रद्द

नवी दिल्ली : रेल्वे बोर्डाच्या नव्या आदेशानुसार आता अनारक्षित तिकीट घेतल्यानंतर तीन तासांच्या आत प्रवास सुरू न केल्यास हे तिकीट आपसूकच रद्द होणार आहे.

Updated: Jan 28, 2016, 12:24 PM IST
तीन तासांत प्रवास केला नाही तर रेल्वेचं तिकीट होणार रद्द title=

नवी दिल्ली : रेल्वे बोर्डाच्या नव्या आदेशानुसार आता अनारक्षित तिकीट घेतल्यानंतर तीन तासांच्या आत प्रवास सुरू न केल्यास हे तिकीट आपसूकच रद्द होणार आहे.

तीन तासानंतर आपला प्रवास सुरू करणारे प्रवासी विनातिकीट प्रवास करत आहेत, असं समजलं जाईल. रेल्वेचा हा नवा नियम १ मार्च पासून लागू होईल. 

प्रवासी कमी अंतराच्या प्रवासाचं तिकीट काढून दिवसात अनेकदा प्रवास करतात, अशा प्रकारच्या अनेक तक्रारी रेल्वे मंत्रालयाकडे आल्या होत्या. आता प्रवाशांच्या या चलाखीला रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

आता तिकीट घेतल्यानंतर पहिली ट्रेन सुटल्यापासून पुढील तीन तासच ते तिकीट प्रवासासाठी वैध राहणार आहे. या तिकीटांसोबत वैधतेचे अंतरही निश्चीत केले जाईल.