प्रियांका गांधी करणार काँग्रेसचं नेतृत्व?

सध्या देशभरात काँग्रेसची परिस्थिती बिकट झाल्यामुळे राहुल गांधींऐवजी काँग्रेस पक्षाची जबाबदारी राहुल गांधीऐवजी प्रियंका गांधींकडे देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसमध्ये होऊ लागली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 2, 2013, 04:25 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
सध्या देशभरात काँग्रेसची परिस्थिती बिकट झाल्यामुळे राहुल गांधींऐवजी काँग्रेस पक्षाची जबाबदारी राहुल गांधीऐवजी प्रियंका गांधींकडे देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसमध्ये होऊ लागली आहे. काही जणांना प्रियंका गांधींमध्ये इंदिरा गांधींचं रूप दिसतं. त्यामुळे आधीपासूनच प्रियंका गांधींना सोनिया गांधीची वारस मानून तिचं पक्षात मोठं स्थान निर्माण व्हावं यासाठी प्रयत्न सुरू केले जात आहेत.
राहुल गांधींच्या राजनैतिक अपरिपक्वतेबद्दल पक्षातही चर्चा सुरू झाली आहे. राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली केंद्रात पुन्हा काँग्रेसचं सरकार येणं कठीण वाट लागल्यामुळे प्रियंका गांधींना पुढे आणत काँग्रेसची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. सोनिया गांधींनंतर काँग्रेसचं नेतृत्व प्रियंका गांधींनीच करावं, अशी मागणी होऊ लागली आहे. रॉबर्ट वॉड्रावर केडरीवाल यांनी केलेल्या आरोपांमुळे जरी प्रियंका गांधींची प्रतिमा मलिन झाली असली, तरी राहुल गांधींपेक्षा प्रियंका गांधी काँग्रेस पक्षाची जबाबदारी अधिक प्रगल्भतेने संभाळू शकेल, असा विश्वास काँग्रेसी जनांना वाटत आहे.

सोनिया गांधींना स्वतःलाही प्रियांका गांधींवर अधिक विश्वास आहे. आपल्या आजारपणानंतर राजकारणात केवळ सुपरवायजरचं काम करत प्रियंका गांधींना आपल्य़ा पदी बसवण्याची शक्यता आहे. रायबरेलीतूनही प्रियंका निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.