पंतप्रधानांच्या 'मन की बात'मध्ये झी मीडियाचं कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १४ व्या मन की बात मध्ये झी मीडियाचं कौतुक केलंय. झी न्यूजनं २५ नोव्हेंबरला उत्तर प्रदेशातल्या कानपूरच्या एका छोट्या खेड्यात सौर उर्जेचा वापर करून ५०० घरं उजळवणाऱ्या ' नूर जहाँ' या महिलेची कहाणी दाखवली. नूर जँहाचा उल्लेख करून पंतप्रधान मोदींनी झी न्यूज तिच्या कामाची दखल घेतल्याबद्दल कौतुक केलं. नूर जँहा महिना १०० रुपये भाडं घेऊन तिच्या गावातल्या ५०० घरांना सौर कंदीलाची सेवा पुरवते.  

Updated: Nov 29, 2015, 06:59 PM IST
पंतप्रधानांच्या 'मन की बात'मध्ये झी मीडियाचं कौतुक title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १४ व्या मन की बात मध्ये झी मीडियाचं कौतुक केलंय. झी न्यूजनं २५ नोव्हेंबरला उत्तर प्रदेशातल्या कानपूरच्या एका छोट्या खेड्यात सौर उर्जेचा वापर करून ५०० घरं उजळवणाऱ्या ' नूर जहाँ' या महिलेची कहाणी दाखवली. नूर जँहाचा उल्लेख करून पंतप्रधान मोदींनी झी न्यूज तिच्या कामाची दखल घेतल्याबद्दल कौतुक केलं. नूर जँहा महिना १०० रुपये भाडं घेऊन तिच्या गावातल्या ५०० घरांना सौर कंदीलाची सेवा पुरवते.  (ज्या महिलेचे कौतुक केले त्या महिलेचा व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)

यामुळे पर्यावरण रक्षणसोबतच सारा गाव उजळण्याचं काम झाल्याचं पंतप्रधानांनी म्हटलंय.  आजच्या मन की बात मध्ये जागतिक पर्यावरण बदलासंदर्भातल्या अनेक उपक्रमांची पंतप्रधान मोदींनी माहिती दिली. त्यात जैविक शेतीचं महत्वही पटवून देण्याचा प्रयत्न केला. ३ डिसेंबरला येऊ घातलेल्या जागतिक अपंग दिनाच्या निमित्तानं पंतप्रधांनी पुन्हा एकदा अवयव दानाचं महत्वही पटवून दिलं. 

यावेळी मुद्रा योजना यशस्वी होत असल्याबद्दल सरकारचे कौतुकही केले. यावेळी मुद्रा योजनेदरम्यान आलेले अनुभव त्यांनी शेअर केले. मुद्रा योजनेमुळे देशातील ६६ लोकांना आतापर्यंत फायदा झालाय. यात महिलांची संख्या तब्बल २४ लाख आहे तर एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील नागरिकांनाही याचा फायदा झाल्याचे मोदी म्हणाले. ही योजना सुरु होऊन खूप दिवस झाले नाहीत. मात्र थोड्या काळातच या योजनेने चांगली उंची गाठली. आतापर्यंत ४२ हजार कोटी रुपये नागरिकांना देण्यात आल्याचे मोदींनी सांगितले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.