मोदी, बेदींकडून अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन

आम आदमी पार्टीमुळे दिल्ली भाजप, काँग्रेस मुक्त झाल्याचे पाहायला मिळालेय. 'आप'ला 65 जागांवर आघाडी घेतल्याने सत्ता आणि विरोधक याच पक्षाचे असणार आहे. या मोठ्या विजयामुळे मुख्यमंत्री पदाचे दावेदार अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या पराभूत मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी अभिनंदन केलेय.

Updated: Feb 10, 2015, 12:45 PM IST
मोदी, बेदींकडून अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन title=

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीमुळे दिल्ली भाजप, काँग्रेस मुक्त झाल्याचे पाहायला मिळालेय. 'आप'ला 65 जागांवर आघाडी घेतल्याने सत्ता आणि विरोधक याच पक्षाचे असणार आहे. या मोठ्या विजयामुळे मुख्यमंत्री पदाचे दावेदार अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या पराभूत मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी अभिनंदन केलेय.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने मिळवलेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरविंद केजरीवाल यांना फोन करून अभिनंदन केले. आम आदमी पक्षाच्या सरकारला केंद्र सरकार दिल्लीच्या विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन मोदी यांनी केजरीवाल यांना दिले आहे. स्वतः मोदी यांनी ट्विटरवर याबद्दल ट्विट करून माहिती दिली.

तर किरण बेदी यांनी केजरीवाल यांना पैकीच्या पैकी मार्क, असे म्हणत त्यांचे अभिनंदन केलेय. आपला सोडचिठ्ठी देत भाजपच्या नेत्या झालेल्या किरण बेदी यांनीही केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे. बेदी निवडणुकीच्या आधी आम्ही विधानसभेत केजरीवाल यांना उत्तर देऊ असे आव्हान दिले होते. आता त्या कसे उत्तर देणार, याकडे लक्ष लागलेय. 

तसेच या निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत झाले. काँग्रेसला एकही जागा मिळण्याची शक्यता नाही. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अरविंद केजरीवाल यांना शुभेच्छा दिल्यात.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.