मेहबूबनगर : तेलंगणा राज्यात पेद्दाकुंता असं एक गाव आहे, ज्या गावात फक्त विधवा महिलाच राहतात. या गावात पहिल्यापासून विधवा राहतात असं नाही, त्यांना विधवा एक हायवेने केलं आहे. त्यांच्या गावाजवळून जेव्हा मोठा हायवे गेला, तेव्हा त्यांना आनंद झाला होता, मात्र हिट अॅण्ड रन सारखे एवढे प्रकार वाढले की, या गावात आता एकही पुरूष उरलेला नाही.
या गावात १८ ते ३६ वर्ष वयाचा तरूण महिलाच राहिल्या आहेत. विधवा महिलांचं गाव असल्याने शेजारील गावातील लोकांनी आता या गावातील महिलांना त्रास देणे सुरू केले आहे.
या गावातील घरांचे दरवाजे रात्री अपरात्री कधीही ठोठावले जात असल्याने महिलांमध्ये आता घबराट परसली आहे. या गावातील सहा घरांची दारं आता कायमची बंद झाली आहेत. कारण या घरातील सासवांनी आपल्या सुनांना कुणाकडून त्रास होणार नाही. म्हणून त्यांना त्यांच्या माहेरी पाठवलं आहे.
गावातील हायवे या महिलांना शाप वाटत असला, तरी रस्त्यांवरील अपघात वाढत चालले आहेत, आणि याचा सर्वात मोठा दुष्परीणाम हा या गावात पाहायला मिळतोय. एक स्मशान शांतता पसरलेलं गावं, ज्यात कुणीही पुरूष नाही, आणि पुरूषांची या गावातील महिलांवर नेहमीच वाईट नजर आता घोंगावत असते.
या गावात एकूण ४० परिवार सुरूवातीला होते, आता पुरूष म्हणून या गावात फक्त एक सहा वर्षांचा मुलगा आहे. या गावाजवळून २००६ साली हायवे गेला तेव्हा लोक खूप खुश होते. मात्र दहा वर्षांच्या आत एवढे अपघात या गावातील लोकांचे झाले की, अख्ख्या गावातील महिलाच विधवा झाल्या.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर हे गाव आहे. या महामार्गावर आतापर्यंत ८० लोक अपघातात ठार झाले आहेत. या गावातील मुख्य ग्रामपंचायत नंदीग्राम आहे, नंदीग्रामला जाण्यासाठी त्यांना दोन बायपास पार करावे लागतात. या गावातील महिलांना पेन्शन देण्याचं सरकारने ठरवलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.