मुंबई : तुम्हाला रेल्वेने कुठे जायचे आहे. पण तुमचं तिकीट जर कंन्फर्म झालं नसेल आणि तरी तुम्ही रिजर्व डब्यातून प्रवास करत असाल तर ते तुम्हाला महागात पडू शकतं.
रेल्वेने आता अशा प्रकारच्या तिकिटाला अवैध ठरवलं आहे आणि कन्फर्म न झालेलं तिकिट घेऊन रिझर्व डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून दंड घेण्याचा निर्णय घेतला आहे.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीत त्याने म्हटलं आहे की ' वेटिंगवर असलेल्या तिकिटाने आता तुम्ही प्रवास करू शकत नाही. पण जनरल डब्यातून प्रवास करण्यास रेल्वेने परवानगी दिली आहे.'
याआधी फक्त राजधानी आणि शताब्दी एक्स्प्रेसमधून वेटिंग तिकीटवर प्रवास करण्याची परवानगी होती. पण काही प्रवाशी हे वेटिंग तिकिटावर इतर गाड्यांमधूनही रिझर्व डब्यातूनच प्रवास करायचे आणि रेल्वेकडून रिफंड पैसे मिळवायचे. ही बाब रेल्वे प्रशासनाला लक्षात आल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.