जगातील सर्वाधिक मुस्लिम भारतात

जगभरातील प्रमुख धर्मांचा अभ्यास करून एक अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार २०५० मध्ये जगभरातील लोकसंख्येनुसार हिंदू तिसऱ्या स्थानावर येणार आहेत. तर २०५०मध्ये भारत सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश बनणार आहे.

Updated: Apr 3, 2015, 06:03 PM IST
जगातील सर्वाधिक मुस्लिम भारतात title=

वॉशिंग्टन : जगभरातील प्रमुख धर्मांचा अभ्यास करून एक अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार २०५० मध्ये जगभरातील लोकसंख्येनुसार हिंदू तिसऱ्या स्थानावर येणार आहेत. तर २०५०मध्ये भारत सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश बनणार आहे.

सध्या जगातील सर्वाधिक मुस्लिम इंडोनेशियात आहेत. प्यू संशोधन केंद्राने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालातील आकडेवारीनुसार जगभरातील हिंदूची संख्या ३४ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २०५० सालापर्यंत जगातील हिंदूंचे प्रमाण १४.२ टक्के इतके असणार असून लोकसंख्येनुसार जगभरात हिंदू तिसऱ्या स्थानावर असतील.

ख्रिश्चन धर्म २०५०मध्येही पहिल्या स्थानावर कायम राहील असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोणत्याही धर्माचे अनुकरण न करणाऱ्यांचे प्रमाण १३.२ टक्के इतके असेल. २०५०पर्यंत जगातील मुसलमानांची लोकसंख्या २.८ अब्ज इतकी असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पाकिस्तानात २०१०च्या गणनेनुसार १७ कोटी ८० लाख ९७ हजार मुस्लिम लोकसंख्या आहे, तर भारतात सुमारे १७ कोटी ६० लाख मुस्लिम राहतात.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.