नवी दिल्ली : जेएनयूमधील एक विद्यार्थी गायब असल्याच्या मुद्द्यावरून तिथले विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. संतप्त विद्यार्थ्यांनी बुधवारी विद्यापीठाचे कुलगुरू आणि पदाधिका-यांना त्यांच्याच कार्यालयात कोंडून ठेवलं. त्यांच्या दालनाबाहेर विद्यार्थी झोपले आणि कुलगुरुंना विद्यार्थ्यांनी बाहेर जाऊ दिलं नाही.
बाहेर जायचंच असेल, तर आम्हाला तुडवून जा, असा पवित्रा या विद्यार्थ्यांनी घेतला. यात आपण काहीही बेकायदेशीर करत नसल्याचा जेएनयू विद्यार्थी परिषदेचा दावा आहे.
आपल्याला बाहेर जाऊ देत नसल्याबद्दल कुलगुरुंनी संताप व्यक्त केलाय. नजीब अहमद नावाचा विद्यार्थी गेल्या सहा दिवसांपासून गायब आहे. त्यावरून जेएनयू विद्यार्थी परिषद आणि अभाविपचे विद्यार्थी एकमेकांवर आरोप करत आहेत.