जनार्दन रेड्डींनी १०० कोटी सफेद केले-ड्रायव्हरची सुसाईड नोट

कर्नाटकच्या एका सिनिअर ऑफिसरच्या ड्रायव्हरने आत्महत्या केली आहे, आत्महत्येआधी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने भाजप नेता आणि खनन माफियांवर आरोप केले आहेत.

Updated: Dec 7, 2016, 07:36 PM IST
जनार्दन रेड्डींनी १०० कोटी सफेद केले-ड्रायव्हरची सुसाईड नोट title=

बंगलुरू : कर्नाटकच्या एका सिनिअर ऑफिसरच्या ड्रायव्हरने आत्महत्या केली आहे, आत्महत्येआधी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने भाजप नेता आणि खनन माफियांवर आरोप केले आहेत.

भाजप नेते जनार्दन रेड्डी यांच्यावर गंभीर आरोप करत, सुसाईड नोटमध्ये केसी रमेश या ड्रायव्हरने म्हटलंय, जनार्दन रेड्डी यांनी १०० कोटी रूपये सफेद केले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

कर्नाटकातील एक ज्येष्ठ नोकरशहाला जनार्दन रेड्डी यांनी १०० कोटी रूपये सफेद करण्यासाठी दिले होते. रेड्डीने मुलीच्या लग्नाच्या आधी हे पैसे सफेद केले, ज्यात सिनिअर ऑफिसरने रेड्डीची मदत घेतली.

यात रमेशचं मानसिक शोषण करण्यात आलं, रेड्डी यांनी हे पैसे या सिनिअरला २० टक्के कमिशनने सफेद करण्यासाठी दिले असल्याचं केसी रमेश यांनी सूसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. रेड्डींनी २५ कोटी रूपयांचं काळधन ताज हॉटेलमध्ये सफेद केलं.

रमेशने लिहिलंय, दोन कार वापरून १०० कोटी रूपये संबंधित जागेवर सफेद करण्यात आले. या बदल्यात रेड्डींना ५० आणि १०० रूपयांच्या नोटा देण्यात आल्या.

जनार्दन रेड्डी ही मागील महिन्यात बंगलोरमध्ये आपल्या मुलीचा शाही विवाह सोहळ्यामुळे चर्चेत आले होते. या लग्नात पाण्यासारखा पैसा वापरला गेल्याची टीका होत होती.