www.24taas.com , वृत्तसंस्था, नवी दिल्ली
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची खासदारकी रद्द झाली आहे. लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनी तशी घोषणा केली आहे. दरम्यान, चारा घोटाळ्याप्रकरणी लालू यांना ५ वर्षांची शिक्षा झाली आहे.
चारा घोटाळ्याप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या राजद प्रमुख लालू प्रसाद आणि जेडीयू नेते जगदीश शर्मा यांची खासदारकी रद्द झालीय. लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनी ही घोषणा केलीय. लालू प्रसाद यादव यांना कोर्टानं चारा घोटाळा प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावलीय तर त्यानंतर सहा वर्षे त्यांना निवडणूक लढवता येणार नाही. म्हणजे तब्बल ११ वर्षे लालू प्रसाद यादव राजकीय आखाड्यापासून दूर राहणार आहेत.
कालच माजी मंत्री आणि काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार असेलेले रशीद मसूद यांची खासदारकी रद्द झाली आहे. तर लालू प्रसाद यादव यांना फसवण्यात आलं असून आपला कोर्टावर पूर्ण विश्वास असल्याचं त्यांची पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी म्हटलं आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.