www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
रिलायन्स मोबाईलच्या बिलमध्ये १०० रु. लेट फी घेतली म्हणून एका कापड व्यापारानं रिलायन्स मोबाईलचे मालक अनिल अंबानींसह पाच जणांविरुद्ध एफआयआर नोंदवलीय. चुकीचं बिल पाठवल्याच्या कारणास्तव जितेंद्र शुक्लाने हा एफआयआर नोंदवला आहे.
जितेंद्र यांनी २५० रूपये जमा करून रिलायंसच पोस्टपेड कनेक्शन विकत घेतलं. या वेळी त्यांनी पहिल्या बिलात आलेले १५० रूपये देखील भरले. यानंतर ९ महिने शुक्लांना रिलायंसने बिल पाठवलंच नाही. अचानक २० डिसेंबर २०१३ रोजी जितेंद्र यांना रिलायन्सचं बिल आलं. यात रिलायंसने जितेंद्र यांना १०० रूपये प्रती महिन्याच्या हिशोबाने लेट फी लावली.
या गोष्टीचा प्रचंड संताप आलेल्या जितेंद्र यांनी कानपूर पोलिसांच्या फेसबुक पेजवर ऑनलाईन तक्रार नोंदवली. यात जितेंद्र यांनी रिलायन्स कंपनीच्या व्यवहारामुळे मला आर्थिक आणि मानसिक त्रास झाल्याचे सांगितले आहे. या प्रकारणाची चौकशी केल्यानंतरच अनिल अंबानी यांच्या विरूद्ध योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.