हैदराबाद : ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेनं इराकमध्ये घातलेला धुमाकूळ अनेक बातम्यांमधून समोर येतंच आहे पण, हीच इसिस भारतीय तरुणांनाही आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असल्याचं आता पुन्हा सिद्ध झालंय... हैदराबादचा मुनवाद सलमान यानं ‘इसिस’मध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या गूगलच्या नोकरीवर पाणी सोडलंय.
गूगलमध्ये काम करणाऱ्या सलमाननं अचानक आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. त्यानंतर तो या दहशतवादी संघटनेत भर्ती होण्यासाठी इराकला जाण्यासाठी तयार झाला होता. पण, त्यात तो यशस्वी होण्यापूर्वीच हैदराबाद पोलिसांच्या जाळ्यात तो सापडला.
‘इसिस’नं सलमानला आपल्या सोशल मीडिया विंगमध्ये सहभागी करून घेण्यासाठी आपल्या जाळ्यात ओढलं होतं. तो अनेक महिन्यांपासून या संघटनेतील काही सदस्यांच्या संपर्कात होता.
सौदी अरेबियात इसिसनं सलमानला एक नोकरी ऑफर करून आपल्या जाळ्यात ओढलं होतं. यासाठी सलमान वर्क परमिटवर सौदीला जाण्यास तयार झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिलीय. तामिळनाडूनध्ये राहणारा हाजा फखरुद्दीन पहिला भारतीय व्यक्ती होता जो या पद्धतीनं वर्क परमिटवर सिंगापूरला गेला होता आणि त्यानंतर तो सीरियात जाऊन इसिसमध्ये सहभागी झाला होता. पण, सलमान सौदीला जाण्याअगोदर शेवटच्या काही औपचारिकता पूर्ण करत असतानाच पोलिसांनी त्याला गाठलं.
सहा महिन्यांअगोदरपर्यंत सलमान गूगलमध्ये ‘सिक्युरिटी अॅनालिस्ट’ म्हणून काम करत होता. इसिसमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यानं गूगलची नोकरी सोडली होती.
भारतीय तरुणांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी इसिस त्याच मोडस ऑपरेंडीचा वापर करतंय जी त्यांनी चेन्नईमध्ये वापरली होती. यासाठी, इसिसनं सौदी अरबमध्ये चार युनिट बनवल्या आहेत. सलमानच्या अटकेनंतर हैदराबादमध्ये अलकायदा आणि इसिस या दहशतवादी संघटनांनी आपले हात पसरवण्यास सुरुवात केलेली दिसतेय.
धक्कादायक म्हणजे, हैदराबादमध्ये काही दिवसांपूर्वी कोलकत्याच्या मार्गाने बांग्लादेशला जाणाऱ्या १५ जणांना रोखण्यात आलं होतं. पण, भारतात ‘इसिस’वर अजूनही प्रतिबंध नसल्यानं या १५ जणांना सोडून देण्यात आलं. हे १५ जण आता बांग्लादेशाच्या रस्त्यानं इराकमध्ये जाऊन इसिसमध्ये सहभागी झालेत. पोलिसांच्या माहितीनुसार, सलमानवरही गुन्हा नोंद करण्यात काही अडचणी येऊ शकतात... त्यालाही काही दिवसांनी पोलिसांना सोडून द्यावं लागेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.