नवी दिल्ली : एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या औरंगाबादच्या रफिक शेख यांच्यासमोर आणखी एक संकट उभं ठाकलंय.
एव्हरेस्ट शिखर सर करून उतरताना हिम दंशामुळे त्यांच्या पायाला गंभीर इजा झालीय. त्यामुळं तातडीने त्यांना काठमांडूच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.
त्यांना उपचारापूर्वी कॅम्प 2 वरून बेस कॅम्प आणि तिथून काठमांडूला हेलिकॉप्टरने आणण्यात आलंय. त्यासाठी जवळपास 8 लाख रुपये खर्च आलाय. सध्या त्यांच्याबरोबर काही गिर्यारोहक आहेत. शिवाय सोमवारी नाशिकमधून काहीजण जातायत.
मात्र, आधीच मोहिमेला जाताना पैशाची कशीबशी तजवीज करून निघालेल्या रफिक यांच्यासमोर इतक्या मोठ्या खर्चाचे संकट उभं ठाकलंय. सोमवार किंवा मंगळवारी त्यांना काठमांडूवरून दिल्लीच्या लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात येणार आहे. यासाठी त्यांना आता मोठ्या मदतीची गरज आहे.