www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आता मुदतवाढ मिळालीय. आता तुम्हाला ५ ऑगस्टपर्यंत रिटर्न्स भरावे लागणार आहेत.
इन्कम टॅक्स रिटर्नच्या मुदतवाढीस केंद्रीय वित्त मंत्रालयानंदेखील मान्यता दिलीय. यापूर्वी ३१ जुलै ही शेवटची तारीख होती, मात्र पाच लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या व्यक्तींना यंदा ई-रिटर्न भरणे सक्तीचे केल्यानंतर आणखी वेळ मिळावा, या दृष्टीने ही मुदतवाढ देण्यात आली. ९२ लाख लोकांनी २९ जुलैपर्यंत तर ३0 जुलै रोजी ६.२३ लाख लोकांनी रिटर्न भरले.
ई-रिटर्न भरण्यासाठी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात इंटरनेटवर ‘गर्दी’ झाल्यामुळे प्राप्तिकर विभागाचा सर्व्हर हँग झाल्याचा अनुभव अनेकांना आला होता, त्यापार्श्वभूमीवर करदात्यांना या मुदतवाढीचा फायदा होणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.