नवी दिल्ली: बॉ़म्बच्या धमकीनंतर आज बँकॉकहून इस्तांबूलला जाणाऱ्या तुर्कस्तान एअरलाईन्सच्या विमानाचं दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमजर्न्सी लँडिंग करण्यात आलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एअरबस 330 हे विमान दुपारी 1.41 वाजता दिल्लीत सुरक्षितपणे उतरलं.
तुर्कस्तानचं हे विमान बँकॉकहून इस्तांबूलच्या दिशेनं जात होतं. मात्र इकॉनॉमी क्लासच्या एक सीटजवळील काचेवर लिपस्टिकने बॉम्ब असल्याची धमकी लिहिली होती. प्रवाशांनी ही धमकी वाचल्यानंतर एकच गोंधळ झाला आणि विमान दिल्लीत उतरवण्यात आलं.
या विमानात 148 प्रवासी होते आणि लॅण्डिंगनंतर त्यांना सुरक्षितरित्या उतरवण्यात आलं. मात्र तपासणीनंतर विमानात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.
अग्निशमन दलाच्या गाड्या, नॅशनल सिक्युरिटी गार्ड अर्थात एनएसजी आणि डॉग स्क्वॉडही उपस्थित होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.