भाजपचं 'पुन्हा मंदिर वही बनाएंगे'

अयोध्यातल्या राममंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा तापू लागलाय. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या पाठोपाठ भाजपनंही पुन्हा एकदा 'मंदिर वही बनायेंगे'चा नारा बुलंद केलाय. तर त्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवायला सुरूवात केलीय.

Updated: Nov 23, 2015, 11:09 PM IST
भाजपचं 'पुन्हा मंदिर वही बनाएंगे' title=

नवी दिल्ली : अयोध्यातल्या राममंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा तापू लागलाय. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या पाठोपाठ भाजपनंही पुन्हा एकदा 'मंदिर वही बनायेंगे'चा नारा बुलंद केलाय. तर त्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवायला सुरूवात केलीय.

अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी आयुष्यभर चळवळ उभारणारे अशोक सिंघल यांचं नुकतंच निधन झालं... त्यांच्या हयातीत राम मंदिराचं स्वप्न साकार होऊ शकलं नाही. मात्र ते स्वप्न पूर्ण करण्याचा विश्वास आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांनी व्यक्त केलाय.

सरसंघचालकांच्या वक्तव्यामुळं आता भाजपलाही नवं बळ मिळालंय. लवकरच राम मंदिराचं बांधकाम सुरू करू, अशी ग्वाही केंद्रीय सामाजिक न्यायमंत्र्यांनी दिलीय. भाजप आणि संघ परिवारानं पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा ऐरणीवर आणलाय. तर दुसरीकडं पराभव दिसू लागला की, भाजपला राम आठवतो, असं शरसंधान काँग्रेसनं केलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.