भूकंपातील जखमींच्या कपाळावर चिकटवली 'भूकंप' लिहिलेलं स्टिकर

Updated: Apr 29, 2015, 08:04 PM IST
भूकंपातील जखमींच्या कपाळावर चिकटवली 'भूकंप' लिहिलेलं स्टिकर title=
पटना : बिहारमधील दरभंगा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलने (डीएमसीएच) भूकंपात जखमी झालेल्या लोकांची ओळख होण्यासाठी त्यांच्या कपाळावर 'भूकंप' लिहलेलं स्टिकर चिटकवलं होतं. याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 
 
भूकंपात जखमींच्या कपाळावर 'भूकंप' लिहीलेलं स्टिकर लावल्याची बातमी चॅनल्सवर दाखवल्यानंतर, जखमींच्या कपाळवरील स्टिकर काढण्याचे आदेश देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. 
 
भूकंपात जखमी झालेल्या 15 जणांना डीएमसीएच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याचवेळेस उपचार करताना त्यांच्या कपाळावर अशा प्रकारची पट्टी चिकटविण्यात आली होती.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.