खुशखबर : सातव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या वेतनात २३.५ टक्के वाढीचा प्रस्ताव

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे. वेतन आयोगानं आपला 'सातव्या वेतन आयोगाच्या' प्रस्तावात कर्मचाऱ्यांच्या वेतनात तसंच भत्त्यात भरघोस वाढीची सूचना आपल्या अहवालात केलीय. गुरुवारी हा अहवाल केंद्र सरकारकडे सोपवण्यात आलाय. 

Updated: Nov 19, 2015, 09:00 PM IST
खुशखबर : सातव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या वेतनात २३.५ टक्के वाढीचा प्रस्ताव title=

नवी दिल्ली : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे. वेतन आयोगानं आपला 'सातव्या वेतन आयोगाच्या' प्रस्तावात कर्मचाऱ्यांच्या वेतनात तसंच भत्त्यात भरघोस वाढीची सूचना आपल्या अहवालात केलीय. गुरुवारी हा अहवाल केंद्र सरकारकडे सोपवण्यात आलाय. 

सातव्या वेतन आयोगानं आज सायंकाळी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे अहवाल सोपवला. यामुळे, ५० लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि ५४ लाख पेन्शनधारकांना फायदा होईल. 
 
माहितीनुसार, या अहवालात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात जवळपास २३.५५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय. तर मूळ वेतनात १६ टक्के वाढवण्याची शिफारस करण्यात आलीय. याशिवय प्रत्येक वर्षी एक जुलै रोजी वेतनात वाढ करण्याचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांची कमीत कमी सॅलरी १८,००० तर जास्तीत जास्त वेतन २५ हजार करण्याची सिफारस करण्यात आलीय. 

याशिवाय, कर्मचाऱ्यांना भत्ता ६३ टक्के वाढवण्याची सिफारस, कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये २४ टक्के वाढीचा प्रस्ताव यात ठेवण्यात आलाय. सूत्रांच्या माहितीनुसार, आयएएस, आयपीएस आणि आयआरएस यांचं वेतन एकसमान असावं, असंही या प्रस्तावात म्हटलं गेलंय. 

न्यायमूर्ती ए के माथूर यांच्या अध्यक्षतेखाली वेतन आयोगानं केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मूळ वेतन, महागाई भत्ता वाढवण्याच्या सूचना केल्यात. याशिवाय एचआरए आणि इतर भत्त्यांतही वाढ होणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या सिफारशी १ जानेवारी २०१६ पासून लागू होतील. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.