पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. बिहारमधील नव्वद टक्के पुरुषांचे दुसऱ्यांच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध असतात, असं वक्तव्य मांझी यांनी केलंय.
मांझी हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहिले आहेत. मात्र, यावेळी त्यांनी वादग्रस्त वक्तव्याची सीमा पार केली आहे.
एका नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान मांझी यांनी म्हटले आहे की, "मैत्रीण असणे हे काही चुकीचे नाही. पाटणा शहरातील विविध बागांमध्ये जाऊन पाहिले तर युवकांबरोबर महिलांही दिसून येतील. पुरुष आणि महिलेकडून संमती असेल तर यामध्ये चुकीचे असे काहीच नाही. नव्वद टक्के पुरुष हे दुसऱ्याच्या पत्नीबरोबर बाहेर फिरायला जाताना दिसतात."
"एखाद्या आरोपीला शिक्षा देताना काही प्रमाणात कोटा पद्धत असायला हवी. एखादी गरीब व्यक्ती कष्ट करून घर चालवत असेल आणि एखाद्या गुन्ह्यात ती सापडली तर शिक्षा कमी करायला पाहिजे," असेही मांझी म्हणाले.
दरम्यान, मांझी यांच्या मुलाचे एका महिला पोलिसासोबत प्रेमसंबंध असल्याचं सांगण्यात येतंय. यावरून मांझी यांनी यात काहीही चुकीचं नसल्याचं सांगण्यासाठी अशी वक्तव्य केली असण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.