नाइट शिफ्ट केल्यानं बिघडते सेक्स हॉर्मोन लेव्हल

जर आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी करत असाल आणि नाइट शिफ्ट आपल्या लाइफस्टाइलचा अविभाज्य भाग बनली असेल तर सावध व्हा... नाइट शिफ्टमुळे एकीकडे जिथं आपल्या सोशल लाइफवर वाईट परिणाम होतोय. तर दुसरीकडे आपल्या आरोग्याला यामुळं धोका निर्माण होऊ शकतो. 

Updated: Jul 21, 2015, 07:44 PM IST
नाइट शिफ्ट केल्यानं बिघडते सेक्स हॉर्मोन लेव्हल title=

नवी दिल्ली: जर आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी करत असाल आणि नाइट शिफ्ट आपल्या लाइफस्टाइलचा अविभाज्य भाग बनली असेल तर सावध व्हा... नाइट शिफ्टमुळे एकीकडे जिथं आपल्या सोशल लाइफवर वाईट परिणाम होतोय. तर दुसरीकडे आपल्या आरोग्याला यामुळं धोका निर्माण होऊ शकतो. 

नाइट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांमध्ये प्रोस्टेट कँसर आणि ब्रेस्ट कँसर होण्याची भिती अधिक आहे. या शिफ्टमध्ये काम केल्यानं हार्मोन्सवर वाईट परिणाम होतो. ज्यामुळं कँसरची भिती अधिक वाढते. 

ही बाब याआधीही पुढे आली होती की, नाइट शिफ्ट करणाऱ्यांमध्ये कँसर होण्याची भिती वाढते. मात्र तेव्हा यामागचं नेमकं कारण कळत नव्हतं. पण आता बार्सिलोनाच्या पोंपेयु फाबरा यूनिव्हर्सिटीमध्ये एका अभ्यासात याच्या कारणांचा उल्लेख केला गेलाय.

संशोधकांनुसार, नाइट शिफ्ट करणाऱ्यांमध्ये चुकीच्या वेळी सेक्स हार्मोन्स 
oestrogen आणि testosteroneची लेव्हल खूप अधिक वाढते. त्यामुळं आरोग्याच्या अनेक तक्रारी सुरू होतात. 

या अभ्यासासाठी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या जवळपास १०० लोकांच्या यूरिन सॅम्पलची तपासणी केली गेली. सोबतच त्यांच्या हार्मोन लेव्हलचीही तपासणी केली गेली. परीक्षणात नाइट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांमधील सेक्स हार्मोन लेव्हल अधिक आढळली, जी की वेळेनुसार वाईट आणि आरोग्यासाठी घातक आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.