ह्युस्टन : भारतीय वंशाच्या एका अमेरिकन प्रोफेसरने सुपर कंडोम बनवलाय. हा कंड़ोम एचआयव्ही व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी फायदेशीर असल्याचा दावा या प्रोफेरसनी केलाय. तसेच लैंगिक सुख वाढवण्याचे कामही हा कंडोम करेल.
कोटेक्सास ए अँज एम विद्यापीठातील महुआ चॅटर्जी आणि त्यांच्या टीमने हा कंडोम विकसित केलाय. या कंडोमचा उपयोग केवळ नको असलेली गर्भारपण टाळण्यासाठीच होणार नाही आहे तर एचआयव्ही या आजाराविरुद्ध लढण्यासाठी याचा मोठा फायदा होईल.
हा कंडोम पॉलिमरचा तयार करण्यात आलाय. यात वनस्पतींमध्ये असणारे अँटिऑक्सिंडट वापरण्यात आलेय यामुळे एड्सला काही प्रमाणात आळा बसणार आहे. कोटेक्सास ए अँज एम विद्यापीठात सहाय्यक प्रोफेसर असणाऱ्या महुई यांना बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या ग्रँड चॅलेंज इन ग्लोबल हेल्थ या मोहिमेसाठी अनुदान देण्यात आले आहे.