डोकेदुखी दूर करण्याचे तीन घरगुती उपाय

डोकेदुखी एक खूप सामान्य आजार आहे. जो कोणालाही आणि कधीही होण्यास सुरुवात होते. याचा वेळीच इलाज न केल्यास त्याचे वाईट परिणाम शरीरावर होतात.

Updated: Aug 17, 2016, 04:27 PM IST
 डोकेदुखी दूर करण्याचे तीन घरगुती उपाय title=

मुंबई : डोकेदुखी एक खूप सामान्य आजार आहे. जो कोणालाही आणि कधीही होण्यास सुरुवात होते. याचा वेळीच इलाज न केल्यास त्याचे वाईट परिणाम शरीरावर होतात.

डोकेदुखी होण्यास सुरुवात झाल्यावर काय करावे याच्यासाठी काही उपाय दिलेले आहेत. या उपायांचा अवलंब केल्यास केवळ एका मिनिटात तुमची डोकेदुखी नक्की थांबेल. 

पेनकिलर घेतल्याने डोकेदुखी थांबते पण असा गोष्टी सतत केल्याने म्हणजेच डॉक्टरांच्या सल्ल्याविनाच गोळ्या घेतल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यासाठी खाली दिलेले आयुर्वेदीक उपाय वापरा.

सुंठाची पेस्ट 
सुंठ सुकी आलं असते. याची एक चमचा पावडर घ्या. पाणी टाकून त्याची पेस्ट बनवा आणि गरम करुन घ्या. यानंतर हे मिश्रण कपाळावर लावा. थोड्याच वेळात डोकेदुखी थांबेल. 

दालचिनी पेस्ट
हिवाळ्यात अनेकांना डोकेदुखीची समस्या होते. अशावेळी दालचिनी पावडरमध्ये पाणी टाकून पेस्ट बनवा. कपाळावर लावा आणि काही वेळानंतर कोमट पाण्याने धुवून घ्या. लवकरच आराम मिळेल.
 
अॅक्युप्रेशरही आहे फायदेशीर 
आपल्या हाताचा अंगठा आणि तर्जनीमध्ये असणाऱ्या जागेत हलका मसाज करण्यात सुरुवात करा. दोन्ही हातांवर अशी क्रिया करा. यामुळे एकाच मिनिटात डोकेदुखी कमी होईल.