मुंबई : तुम्हाला अनेकदा अनेक गोष्टी विसरण्याची सवय आहे किंवा ठरवूनही काही गोष्टींचा विसर तुम्हाला पडतोय... उत्तर हो असेल तर तुम्हाला गरज आहे तुमच्या दिनचर्येत थोडासा बदल करण्याची...
दररोजच्या धावपळीच्या जीवनात थोडा वेळ स्वत:साठी काढून भद्रासन केल्यास तुम्हाला काही दिवसांतच फरक जाणवू लागेल. तुमची समस्या हळूहळू संपुष्टात येईल.
कसं कराल भद्रासन
भद्रासनासाठी अगोदर खाली एखादी चटई अंथरून त्यावर गुडघ्यांवर उभे राहा.
त्यानंतर सर्वात अगोदर तुमचा पाय दुमडून मागच्या बाजुला नेऊन तुमच्या सीट खाली ठेवा
त्यानंतर डावा पायही त्याचप्रमाणे मागे नेऊन सीट खाली ठेवा
गुडघ्यांना एकमेकांना जोडून जमिनीला लागून राहतील असे ठेवा
आता आपल्या शरीराचा पूर्ण भार पंजा आणि टाचांवर टाका
यानंतर आपल्या उजव्या हातानं डाव्या पायाचा अंगठा आणि डाव्या हातानं उजव्या पायाचा अंगठा पकडा.
या स्थितीत जेव्हापर्यंत राहणं शक्य असेल तेव्हापर्यंत राहा
त्यानंतर जालंधर बंध हटवून डोकं वर करून बाहेर श्वास सोडा
त्यानंतर श्वास आत घेऊन जालंधर बंध लावा आणि भद्रासनाचा अभ्यास करा
भद्रासनाचे लाभ
या आसनामुळे शरीराला स्फूर्ती मिळते आणि तब्येतही फीट राहते
मेंदूच्या कार्याला चालना मिळते. कल्पनाशक्तीचा विकास होतो आणि मनाची चंचलता कमी होण्यास मदत होते.
पचनशक्ती वाढण्यास मदत होते.
स्नायू मजबूत होतात
कंबरदुखी, डोकंदुखी, अनिद्रा, दमा, उल्टी, उचकी, अतिसार या आजारांतही भद्रासनाचा वापर होतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.