मुंबई : फळे खाणे आरोग्यासाठी नेहमीच चांगले असते. फळांमध्ये अनेक पोषक तत्वे असतात जी आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पौषक तत्वांनी भरपूर असलेले फळ म्हणजेच संत्रे. रोज संत्रे खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
1. रोज एक संत्रे खाल्ल्याने दिवसभरात शरीराला लागणारे व्हिटामिन सी मिळते. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
2. वाढत्या वयाप्रमाणेच त्याच्या खुणा शरीरावर दिसू लागतात. वाढत्या वयाच्या खुणा कमी कऱण्यासाठी दररोज ताज्या फळांचे सेवन करावे. दररोज संत्रे खाल्ल्याने त्वचा तुकतुकीत होते.
3. रोज संत्रे खाल्ल्याने हृदयरोगाशी संबंधित हार्ट अॅटॅक तसेच इतर आजारांचा धोका कमी होतो.
4. संत्र्यातील फोलेट आणि फॉलिक अॅसिडमुळे मेंदूचा विकास होण्यास मदत होते. गरोदर स्त्रियांनीही नियमित संत्रे खाणे चांगले.
5. संत्र्यामुळे केसगळती रोखण्यास मदत होते.