पुण्यात दुसऱ्या दिवशीही जिल्हाधिकाऱ्यांना घेराव, नाशिकमध्येही घोळ

पुण्यात लोकसभा निवडणुकीसाठी 58 टक्के मतदान झालं असलं तरी मतदार यादीत घोळ झाल्यानं अनेक पुणेकरांना मतदानापासून वंचित राहावं लागलं. पुण्यातल्या मतदार यादीत प्रचंड घोळ असल्याचा मतदारांचा आरोप आहे. जे नागरिक मतदान करू शकले नाहीत त्यांना मतदान करण्याचा अधिकार द्या, अशी मागणी भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांनी केलीय. दुसऱ्या दिवशीही जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी घेराव घातला. तर नाशिकमध्येही घोळ झाल्याचे दिसत आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 18, 2014, 05:52 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे, नाशिक
पुण्यात लोकसभा निवडणुकीसाठी 58 टक्के मतदान झालं असलं तरी मतदार यादीत घोळ झाल्यानं अनेक पुणेकरांना मतदानापासून वंचित राहावं लागलं. पुण्यातल्या मतदार यादीत प्रचंड घोळ असल्याचा मतदारांचा आरोप आहे. जे नागरिक मतदान करू शकले नाहीत त्यांना मतदान करण्याचा अधिकार द्या, अशी मागणी भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांनी केलीय. दुसऱ्या दिवशीही जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी घेराव घातला. तर नाशिकमध्येही घोळ झाल्याचे दिसत आहे.
या मागणीसाठी शिरोळे उपोषणाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. तर मतदान करता न आल्यामुळं संतप्त पुणेकरांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घातलाय. तसंच जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर संतप्त पुणेकरांनी जोरदार घोषणाबाजीही केली.
मोदींच्या लाटेला घाबरून काँग्रेस राष्ट्रवादी मतदार याद्यांमध्ये घोळ घातल्याचं आरोप अनिल शिरोळे यांनी केलाय. यावर आता निवडणूक आयोग काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलयं. मतदार याद्यांमधल्या घोळासंदर्भात संतप्त पुणेकरांनी संताप व्यक्त केलाय. काहींनी लेखी तक्रारही जिल्हाधिकाली यांना केलेय.
दरम्यान, पुण्यातील मतदार याद्यांमधील घोळ म्हणजे षडयंत्र असल्याचा आरोप काँग्रेसनं फेटाळलाय. पुणे काँग्रेस शहराध्यक्ष अभय छाजेड यांनी या प्रकरणी आरोप फेटाळलेत. फेरमतदानाबाबतची संधी मिळण्याबाबत मात्र त्यांनी निवडणूक आयोगाकडे बोट दाखवलंय.
तर दुसरीकडे अमरावती पुणे पाठोपाठ नाशिकमध्येही हजारो मतदार मतदानापासून वंचित राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. नाशिकच्या इंदिरानगर परिसरातल्या 52-53 प्रभागातील मतदार यादीतून शेकडो नावं वगळण्यात आल्याची तक्रार स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकानी `झी मीडिया`कडे केलीय.
गेल्या 25 ते 30 वर्षांपासून जे मतदार मतदान करतायत त्यांची नावं वगळण्यात आलीयेत. सरकार एकीकडे मतदान जागृतीसाठी लाखो रुपये जाहिरातींवर खर्च करते. मात्र एवढं असूनही मतदार यादीत मतदारांची नावं नसल्यामुळे मतदानाच्या अधिकारापासून त्यांना वंचित रहावं लागणारेय.
राजकीय हेतूनं प्रेरित होऊन नाव वगळण्यात आल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेविकेनं केलाय. नाशिकमध्ये 24 तारखेला मतदान होणारेय. प्रशासनाच्या हातात अजून ५ दिवस असल्यानं तत्काळ कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.