गणपती मिरवणुकीवरून सेना-राष्ट्रवादीत राडा, दगडफेक

अहमदनगरमध्ये गणरायाच्या आगमानाच्या निमित्तानं काढण्यात आलेल्या मिरवणुकी दरम्यान राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यावेळी जोरदार दगडफेक केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 10, 2013, 12:28 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, अहमदनगर
अहमदनगरमध्ये गणरायाच्या आगमानाच्या निमित्तानं काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यावेळी जोरदार दगडफेक केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
तोफखाना तरुण मंडळाची ही मिरवणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काढली होती. तसंच या मिरवणुकीत डीजेचा आवाजही मोठा होता. ही मिरवणूक शहरातल्या सुभाष चौकमध्ये येताच शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आमने सामने आले. यावेळी त्यांच्यात वाद निर्माण झाला.
राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला. या वादावादीचे रुपांतर दगडफेकीत झाले. पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप करत परिस्थिती आटोक्यात आणली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
पाहा व्हिडिओ