... असा कराल अंगारकी चतुर्थीचा उपवास

आज अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अनेक जण उपवास करतात. सायंकाळी मंगलमूर्ति श्री गणेशाची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण केले जातात. चंद्रोद्यानंतर गणपती श्लोक वाचून मगच हा उपवास सोडला जातो

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 4, 2012, 11:03 AM IST

www.24taas.com, मुंबई
आज अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अनेक जण उपवास करतात. सायंकाळी मंगलमूर्ति श्री गणेशाची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण केले जातात. चंद्रोद्यानंतर गणपती श्लोक वाचून मगच हा उपवास सोडला जातो. आज जवळपास दीड वर्षानंतर अंगारकी आणि मंगळवारचा योग जुळून आलाय.

अंगारकी चतुर्थी
मंगळवार, ४ सप्टेंबर २०१२
चंदोदय - ९.वाजून ८ मिनिटे

अंगारकी चतुर्थीकथा
गणेश भक्त आणि वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी भरद्वाज अवंती नगरीत राहत होते. क्षिप्रा नदीवर ते एकदा स्नानाला गेले असता एक अप्सरा जलक्रीडा करत होती. तिला पाहून भरद्वाजांचे तेज द्रवीभूत झाले. ते पृथ्वीने धारण केले. त्यानंतर पृथ्वीला जो पुत्र झाला तो जास्वंदीच्या फुलासारखा लाल होता. तो सात वर्षांचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला ऋषींच्या स्वाधीन केला. त्याचे उपनयन केले, वेद शिकविले आणि गणेशमंत्र देऊन उपासना करायला सांगितलं. त्यानंतर तो मुलगा अरण्यात गेला. त्यानं एक सहस्त्र वर्षे तप करून गणेशाला प्रसन्न केलं. स्वर्गात राहून अमृतप्राशन करायचा आणि त्रैलोक्यात विख्यात व्हायाचा वर त्यानं प्रसन्न झालेल्या गणेशाकडे मागितीला. यावर गणेशानं, आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी होवो असं वरदान दिलं. `तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम, अकारकासारखा लाल आहे म्हणून अंकाकर व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगल असेही प्रसिद्ध होईल, या चतुर्थीला अंकारकी म्हणतील व हे व्रत करणाऱ्यांना ऋणमुक्त करणारी व पुण्यप्रद ठरेल. तुला आकाशात ग्रहांमध्ये स्थन मिळेल व तू अमृतपान करशील` असा वर त्याला गणेशानं दिला. तोच वार मंगळवार होता आणि गणेशाच्या वरदानामुळे अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालं.
गणेश श्लोक
गणेशायनमस्तुभ्यंसर्वसिद्धिप्रदायक।
संकष्टहरमेदेव गृहाणाघ्र्यनमोऽस्तुते॥
कृष्णपक्षेचतुथ्र्यातुसम्पूजितविधूदये।
क्षिप्रंप्रसीददेवेश गृहाणाघ्र्यनमोऽस्तुते॥