अफवा... सृष्टीच्या अंताची

सृष्टीच्या अंताच्या अफवा यापूर्वीही पसरवण्यात आल्या होत्या आणि त्या वेळो वेळी खोट्या ठरल्या. पण अशा अफवा का पसरवल्या जातात? ज्या माया कॅलेंडरच्या आधारे अफवा पसरवण्यात आली होती ते माया कॅलेंडर नेमकं काय आहे? पृथ्वीला खरंच धोका संभवतोय का? या सगळ्या प्रश्नांचा हा वेध...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 21, 2012, 09:00 PM IST

www.24taas.com, मुंबई
२१ डिसेंबर २०१२ ला सृष्टीचा अंत होईल अशी अफवा जगभर पसरली होती. इंटरनेटवर तर अफवांचं पेवच फूटलं होतं. पण ती आफवा केवळ अफवाच ठरली. पृथ्वीला पुढचे चार अब्ज वर्ष कोणताच धोका संभवत नसल्याचं नासाच्या वैज्ञानिकांनी सांगितलं होतं आणि तेच खरं ठरलं... सृष्टीच्या अंताच्या अफवा यापूर्वीही पसरवण्यात आल्या होत्या आणि त्या वेळो वेळी खोट्या ठरल्या. पण अशा अफवा का पसरवल्या जातात? ज्या माया कॅलेंडरच्या आधारे अफवा पसरवण्यात आली होती ते माया कॅलेंडर नेमकं काय आहे? पृथ्वीला खरंच धोका संभवतोय का? या सगळ्या प्रश्नांचा हा वेध...

२१ डिसेंबर २०१२ ला सृष्टीचा अंत होणार असल्याची आफवा गेले काही दिवस जगभर पसरली होती. २१ डिसेंबर हा पृथ्वीचा शेवटाचा दिवस असल्याची आफवा अखेर अफवाच ठरली आणि खरंतर तेच होणार होतं. कारण सृष्टीचा अंत होणार नसल्याचं नासाने यापूर्वीचं सांगितलं होतं. एखादा ग्रह किंवा धूमकेतू पृथ्वीवर येऊन आदळण्याची कोणतीच शक्यता नसल्याचं नासाच्या शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलं होतं. तसेच माया संस्कृतीच्या आधारे जे काही तर्क लावले जात आहे ते अत्यंत चुकीचे असल्याचं नासाकडून सांगण्यात आलं होतं. सृष्टीचा अंताच्या आफवेचं खंडन करतांना नासाच्या शास्त्रज्ञांनी आणखी काही बाबींचा खुलासा केला आहे. नासाच्या म्हणण्यानुसार ज्या प्रमाणे आपण दरवर्षी कॅलेंडर बदलतो त्याचप्रमाणे माया संस्कृतीमध्येही कॅलेंडर बदललं जात असे. माया संस्कृतीचं कॅलेंडर लक्षात घेतलं तरी पुढचे चार हजार वर्ष पृथ्वीला कोणताच धोका संभवत नाही. त्यामुळेच २१ डिसेंबरच्या अफवेच्या पार्श्वभूमिवर नासाच्या वैज्ञानिकांनी जगभरातील जनतेला यापूर्वीच सतर्क केलं होतं. तसेच ही केवळ एक आफवा असल्याचं सांगितलं होतं. पण अफवा पसरवणाऱ्यांनी ही अफवा पसरवतांना वैज्ञानिक भाषेचा वापर केला होता. त्याचा प्रतिवाद करताना नासाने एस्ट्रॉनॉमी, मायन कॅलेंडर, एस्ट्रॉईड आणि क्लायमेट चेंज अशा विविधि विषयावर लोकांच्या मनात असलेल्या शंकांचं निरसन केलं. नुकतेच नासाच्या शास्त्रज्ञांनी इंटरनेट चॅटिंगच्या माध्यमातून लोकांना ही माहितीही दिली होती.

सृष्टीच्या अंतासाठी अफवा पसरवणाऱ्यांनी प्लॅनेट एक्सचा वापर केला होता. प्लॅनेट एक्स पृथ्वीवर आदळणार असल्याचा दावा करण्यात आला होता. पण नासाने त्यांच्या दाव्यातून हवाच काढून घेतली होती प्लॅनेट एक्स हा सूर्यमालेबाहेरील एक ग्रह असून तो वेगाने पृथ्वीच्या दिशेनं येत असून २१ डिसेंबर २०१२ला तो पृथ्वीवर येवून आदळणार आहे, असं प्लॅनेट एक्सच्या माध्यमातून पसरवण्यात आलं होतं. मात्र, प्लॅनेट एक्स नावाच्या ग्रहाविषयी कोणतीच माहिती वैज्ञानिकांकडं नव्हती. याविषयी नासाच्या वैज्ञानिकांनीही स्पष्टीकरण दिलं होतं. पृथ्वीच्या दिशेनं येणारा प्लॅनेट एक्स नावाचा कोणताच ग्रह आस्तित्वात नसल्याचं नासाच्या वैज्ञानिकांनी सांगितलं होतं. तसेच २१ डिसेंबरला अशी कोणतीच घटना घडणार नसल्याचं नासाच्या वैज्ञानिकांनी स्पष्ट केलं होतं. प्लॅनेट एक्सच्या आफवेचा संबंध निब्रू ग्रहाशी जोडण्याचा प्रयत्न केला गेला होता. निब्रू नावाचा एक ग्रह पृथ्वीच्या दिशेनं येत असल्याची अफवाह गेल्या काही वर्षांपासून पद्धतशीरपणे पसरवण्यात येत आहे. पण शास्त्रज्ञांनी या आफवेचंही खंडन केलं होतं. ग्रहांमध्ये होणाऱ्या टकरींचा आधार घेत काही लोक जाणून बूजून अशा पद्धतीने अफवा पसरवित असल्याचं खगोल शास्त्राच्या जानकारांनी सांगितलं. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार प्लॅनेट एक्स नावाचा ग्रह पृथ्वीवर आदळण्याची कोणतीच शक्यता नाही. शास्त्रत्रज्ञांनी प्लॅनेट एक्सचं आस्तित्व नाकारलं असतांनाही लोकांनी त्याचे तुकडे पृथ्वीवर आदळतांना पाहिले होते मात्र ते सिनेमात... होय... तोच सिनेमा ज्यामध्ये पृथ्वीचा अंत होणार असल्याचं चित्रित करण्यात आलं होतं..काहींच्या म्हणण्यानुसार या सिनेमाच्या प्रचारासाठीच पृथ्वीचा अंत होणार असल्याची आफवा पसरवण्यात आली होती. पण पुढचे चार अब्ज वर्ष पृथ्वीला कोणताच धोका संभवत नसल्याचं नासाकडून सांगण्यात आलं आहे. शास्त्रज्ञांनी चार अब्ज वर्ष पर्यंतच गणणा केली असून अद्याप पुढची गणणा करणं बाकी आहे. त्यामुळे २१ डिसेंबर २०१२ ला पृथ्वी नष्ट होणार असल्याच्या दाव्यात कोणतच तथ्य नसल्याचं यापूर्वीच उघड झालं होतं. २१ डिसेंबरला तेच घडलं. नेहमी प्रमाणे सकाळी सूर्य उगवला आणि सायंक