पुण्यातील स.प. महाविद्यालयाला दणका, मान्यताच रद्द

पुण्यातील एस.पी. महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्यात आल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या महाविद्यालयाने बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज न स्विकारल्याने राज्याच्या उच्च माध्यमिक महामंडळाने नियमाला फाटा दिल्याच्या कारणाने जोदरार झटका दिलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 28, 2013, 09:27 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुण्यातील स. प. महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्यात आल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या महाविद्यालयाने खोटी गुणपत्रिका सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याबाबत केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने राज्याच्या उच्च माध्यमिक महामंडळाने नियमाला फाटा दिल्याच्या कारणाने जोदरार झटका दिलाय.
पुण्यातील स.प.(एस.पी.) महाविद्यामलयाने राज्य उच्चा माध्यमिक महामंडळाच्या नियमांच पालन न केल्यालबद्दाल जोरादार दणका दिला. या दणक्यामुळे महाविद्यालयातील ८०० विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे. या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज स्वीकारणे मंडळाने बंद केले.
फेब्रुवारीत झालेल्या १२वी परीक्षेचा ऑनलाईन निकाल ३० मे रोजी जाहीर झाला. मात्र, एका विद्यार्थ्याला त्यात ७१ टक्के गुण मिळाले होते. मात्र, ६ जूनला महाविद्यालयात गुणपत्रके देण्यात आली. त्यामुळी त्याला ९५ टक्के गुण असल्याचे दिसत होते. याची दखल घेत मंडळाने या विद्यार्थ्याचे गुणपत्रक खोटे असल्याचे लक्षात आले. हे गुणपत्रक बनावट असल्याचे न्यायलयातही स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांत महाविद्यालयाने तक्रार करण्याची सूचना शिक्षण महामंडळाने केली. मात्र, २० वेळा पत्रव्यवहार करूनही स. प. महाविद्यालय प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने महाविद्यालयावर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय.
दरम्यान, मंडळाने ४८ तासांची मुदत देऊनही पोलिसात तक्रार महाविद्यालयाने केली नाही. २१ नोव्हेंबरला आपल्या महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्याचाही इशारा दिला. परंतु त्याकडेही दुर्लक्ष केल्याने शेवटी महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.