www.24taas.com, झी मीडिया, बंगळुरू
2008मध्ये सिडनी टेस्टमध्ये झालेल्या मंकीगेट प्रकरणाबाबतची वस्तुस्थिती आपल्याला माझ्या पुस्तकात वाचायला मिळेल अस मत माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे यानी व्यक्त केलय.
ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉन्टिंगने नुकतच आपल्या पुस्तकामध्ये याप्रकरणी सचिनच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केल होत. यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास कुंबळेने नकार दिला आहे.
यावर तो म्हणाला की जर तुम्हाला या प्रकरणामध्ये नक्की काय घडल होत याची माहिती हवी असेल तर माझ्या पुस्तकाची आपल्याला वाट पहावी लागेल. या टेस्टमध्ये त्यावेळी अनिल कुंबळेकडेच भारतीय टीमची कॅप्टन्सी होती.
पॉटिंग नावाचा साप सचिनवर पुन्हा उलटला
मुंबई इंडियन्स संघात सचिनच्या खांद्याला खांदा लावून खेळणारा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंग पुन्हा एकदा उलटला आहे. मंकीगेट वादावरून पॉटिंगने सचिनच्या भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. हरभजन प्रकरणात त्याला वाचविण्यासाठी सचिनने केलेल्या वक्तव्य ऐकून मी स्तब्ध झाल्याचे पॉटिंगने म्हटले आहे.
‘ द क्लोज ऑफ प्ले’ या आपल्या आत्मचरित्रात पॉटिंगने म्हटले आहे की, मंकीगेट प्रकरणाच्या सुनावणीवेळी सचिन तेंडुलकरने हरभजनची बाजू का घेतली. मॅच अधिकारी माइक प्रोक्टर यांनी सायमंड्सला कथित वंशभेदी टिप्पणी केल्याबद्दल हरभजन सिंग याला निलंबित केले होते. त्यावेळी हरभजन याने गप्प बसणे पसंत केले होते.
मला समजले नाही सचिनने मॅच अधिकारी माइक प्रोक्टर यांना ही गोष्ट अगोदरच का सांगितली नाही. २००८ मध्ये सिडनी टेस्टवेळी हरभजनने सायमंडला मंकी(माकड) म्हटले होते. त्यामुळे हरभजनला तीन टेस्टसाठी निलंबित केले होते. त्यानंतर अपीलवर सुनावणी दरम्यान हरभजन सिंग यांच्यावरील निलंबन हटविले होते.
न्यूझीलंडचे न्यायमूर्ती जॉन हॅसन यांनी केलेल्या सुनावणीत तेंडुलकरला साक्षीदार म्हणून उपस्थित होता. त्यावेळी त्याने हरभजनच्या बाजूने साक्ष दिली होती.
या वादावर तेंडुलकरच्या भूमिकेवर केवळ पॉटिंगने आक्षेप घेतला नव्हता. पण माजी विकेटकीपर गिलख्रिस्टने पाच वर्षापूर्वी आपल्या आत्मचरित्रातही असा आक्षेप उपस्थित केला होता. या घटनेनंतर हरभजनला केवळ दंड करण्यात आला होता. या घटनेने दोन्ही देशातील संबंध खराब होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
‘डेली टेलिग्राफ’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या काही भागानुसार पॉटिंग म्हटला की, प्रशासकीय चूक म्हणून न्यायाधिशांना हरभजनच्या मागील अपराधांबद्दल काहीच सांगण्यात आले नव्हते. त्यामुळे त्याला जी शिक्षा व्हायला हवी होती, ती झाली नाही. २१ व्या शतकात भारतीय क्रिकेटचे वर्चस्व इतके वाढले होती की त्याला कोणी हात लावू शकत नव्हतं. भारतीय कर्णधार अनिल कुंबळे यांच्या वक्तव्याने ऑस्ट्रेलियाच्या संघाची प्रतिमा खराब झाली होती. कुबळे म्हटला होता की, ऑस्ट्रेलिया संघ खेळ भावनने नाही खेळला.
मंकीगेट प्रकरणाचे अवडंबर माजण्यात आले माइक प्रोक्टर यांनी सर्व पुराव्यांची शहानिशा केल्यानंतर हरभजनला दोषी ठरविले. पण दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने दौरा सोडून जाण्याची धमकी दिली. त्यामुळे प्रोक्टर यांच्या निर्णयानंतर नाही तर आमच्या खेळ भावनेने वाद निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाल्याचे पॉटिंगने म्हटले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४
तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.