मुंबई : वास्तुशास्त्रात जीवन सुखी आणि समृद्ध बनवण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत. जर हे उपाय अमलात आणल्यास तर जीवनातील अनेक समस्या दूर होतील.
१. लक्ष्मीची कृपा राहण्यासाठी नेहमी घराच्या तिजोरीत हळकुंड ठेवावे.
२. वास्तुदोष कमी करण्यासाठी घराच्या मेनगेटवर कुंकूने स्वस्तिक काढा.
३. घरात आठव़ड्यातून एकदा तरी कापूर जाळा.
४. घराच्या दक्षिण-पूर्व कोपऱ्यात पक्ष्यांसाठी पाणी आणि अन्न ठेवावे.
५. घर अथवा दुकानात तांब्याच्या पिरॅमिड ठेवल्याने वास्तुदोष कमी होतात.
६. तिजोरीत कुबेर अथवा श्रीयंत्र ठेवल्याने लक्ष्मी प्रसन्न राहते.
७ दरवाजाच्या खाली चांदीची तार ठेवावी. यामुळे वास्तुदोष दूर होतात.
८. घरात अथवा ऑफिसमध्ये चांगले वातावरण रहावे यासाठी नेहमी ताजी फुले ठेवा.
९. घराच्या मेनगेटजवळ तुळस अथवा केळीचे झाड लावल्यास वास्तुदोष दूर होतात तसेच घरात आनंदाचे वातावरण राहते.
१०. दुकान अथवा ऑफिसमध्ये उत्तर-पूर्व दिशेला मंदिर असावे.
११. पिरॅमिडच्या आकाराचे मंगल यंत्र घरात लावल्यास वास्तुदोष नाहीसे होतात.
१२. घर अथवा ऑफिसमध्ये अॅक्वेरियम असल्यास घरात धन आणि भाग्याची वृद्धि होते.