बाळासाहेबांच्या आयुष्यातले चढ-उताराचे क्षण...

बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रवासावर एक नजर...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 17, 2012, 09:09 PM IST

www.24taas.com, मुंबई
बाळासाहेब ठाकरे - एक झंझावा... बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रवासावर एक नजर...
२३ जानेवारी १९२६ - पुण्यात जन्म... केशव सीताराम ठाकरे (प्रबोधनकार) आणि रमाबाई ठाकरेंचे पुत्र
१९५० - ‘फ्री प्रेस जर्नल’मधून व्यंगचित्रांना केली सुरुवात
१४ जून १९४८ – मीनाताई ठाकरेंशी (पूर्वाश्रमीच्या सरला वैद्य ) यांच्याशी विवाह
ऑगस्ट १९६० - व्यंगचित्र साप्ताहिक ‘मार्मिक’ची स्थापना
१९ जून १९६६ - शिवसेनेची स्थापना
१९६७ - ठाणे नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात
१९६८ - मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा
९ फेब्रुवारी १९७० - सीमाप्रश्नाच्या आंदोलनाप्रकरणी बाळासाहेबांना अटक, अवघ्या महाराष्ट्रभर उमटले पडसाद
२३ जानेवारी १९८९ - सामनाचा शुभारंभ
१९९० – २३.६४ टक्के मतांसह शिवसेना विरोधी पक्ष
१९९५ – शिवसेना-भाजप युतीची सत्ता
२० एप्रिल १९९६ – बाळासाहेबांचा थोरला मुलगा बिंदूमाधव ठाकरे यांचं कार अपघातात निधन
सप्टेंबर १९९६ – बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांचं ह्रद्यविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन
२००३ – बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रं
९ मार्च २००६ – शिवसेनेवर नाराज होऊन बाहेर पडलेल्या बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे यांनी केली नव्या पक्षाची (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) स्थापना
१७ नोव्हेंबर २०१२ – दुपारी ३.३० वाजता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्राणज्योत मालवली आणि एक झंझावात कायमचा शांत झाला.