www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबाद जिल्हा न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. सहा वर्षापूर्वीच्या दगडफेक प्रकरणाबद्दल राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल होता. याच्या सुनावणीवेळी राज ठाकरे गैरहजर राहत असल्याने, त्यांच्या विरोधात वॉरंट बजावण्यात आले.
२१ ऑक्टोबर २००८ रोजी काही मनसे कार्यकर्त्यांनी औरंगाबाद-परतूर एसटीवर दगडफेक केली होती. एसटी ड्रायवर महंमद इब्राहिम पठाण यांनी करमाड पोलीस ठाण्यात तक्रार केली.
त्यानंतर राज ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. राज यांच्या समवेत सात मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखलकरण्यात आला.
या प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी गैरहजर राहल्याने राज यांच्यावर अजामिनपात्र वॉरंट बजावण्यात आले. हे वॉरंट प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अशोक सोनी यांनी राज यांचा हजेरीमाफीचा अर्ज फेटाळून बजावले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.