डिझेल लवकरच महागणार!

पेट्रोल पाठोपाठ आता डिझेलचे दरही नियंत्रण मुक्त होणार आहेत , अशी माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री नमो नारायण मीणा यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली .

Updated: Apr 24, 2012, 04:46 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

पेट्रोल पाठोपाठ आता डिझेलचे दरही नियंत्रण मुक्त होणार आहेत , अशी माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री नमो नारायण मीणा यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली .

डिझेलचे दर नियंत्रणमुक्त करावे , अशी शिफारास नियोजन आयोगाने गेल्या वर्षीच केली होती . परंतु, महागाई आणि भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकलेल्या सरकारने तेव्हा निर्णय घेतला नव्हता . मंगळवारी राज्यसभेमध्ये मीणा यांनी यासंदर्भात माहिती दिली .

दरम्यान , घरगुती गॅसच्या दरावर सरकारचे नियंत्रण कायम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे जनतेला थोडा दिलासा मिळाला आहे . सरकारने २०१०मध्ये पेट्रोलच्या दरावरील नियंत्रण हटविले होते.