www.24taas.com, मुंबई
राज ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे
- पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी परप्रांतियांवर साधला निशाणा
- राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन
- रेल्वेत नऊ हजार जागांसाठी भरती
- रेल्वेच्या भरतीसाठी मनसे करणार मार्गदर्शन
- महाराष्ट्रातील सगळ्या मराठी तरूणांनी रेल्वेमध्ये भरती झालचं पाहिजे – राज
- महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे, त्यासाठी मनसे पुढे सरसावणार आहे – राज
- हा माझा आदेश समजा, दुष्काळग्रस्त भागात जनावरांसाठी चारा आणि पिण्यासाठी पाणी याची सोय झाली पाहिजे – राज
- मुंबईहून जी रसद पाठवायची आहे, ती मी पाठविनच, पण स्थानिक पातळीवर देखील दुष्काळग्रस्तांना मनसेकडून मदत मिळालीच पाहिजे – राज
- दुष्काळग्रस्तांना मी भेट देईन, मात्र त्याआधी त्यांना माझ्याकडून काहीतरी मिळालं पाहिजे तरच मी त्यांच्यासमोर जाऊ शकेन – राज
- महाराष्ट्रात येऊन पैसे मिळवितात, पण महाराष्ट्रासाठी काहीही देत नाही - राज
- हे आमरस वाटणारे कोण आहे हे मी आता शोधून काढणारच आहे - राज
- प्राण्यांचीही वाताहात होत आहे. प्राणी मारले जात आहे - राज
- मनसे कार्यकर्त्यांनी प्राणी मारणाऱ्यानां शोधून काढावं, मिळेल तिथे हाणा, दहशत बसली पाहिजे - राज
- परदेशात जनावरांची कातडी पाठविण्यासाठी आमचे प्राणी मारतात.. या लोकांना अद्दल घडवा - राज
- या सरकारला दुष्काळाचं काहीही घेणदेणं नाही, मग प्राणी मरो अथवा माणसं - राज
- हे आमदार परदेशी जाऊन कसले अभ्यास दौरे करतात - राज
- मंत्र्यांना जिल्हा बंदी करा - राज
- दुष्काळग्रस्तांसाठी कामाला लागा - राज
- दुष्काळग्रस्तांसाठी कामं करा, फक्त झेंडे फिरवत बसू नका - राज
- जिथे गरज आहे त्यांना पाण्याची सोय झालीच पाहिजे - राज
- मी या दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करणार आहे - राज