विरोधी पक्षांच्या आमदारांवरच कारवाई का? - राज

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधीमंडळ मारहाण प्रकरणातील आमदारांवर करण्यात आलेल्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

Updated: Mar 21, 2013, 06:03 PM IST

www.24taas.com, वाशिम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधीमंडळ मारहाण प्रकरणातील आमदारांवर करण्यात आलेल्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली आहे. `आमदारांवर केलेली कारवाई याबाबत माझं काहीही म्हणणं नाही. पण ही कारवाई फक्त विरोधी पक्षाच्या आमदारांवर का केली?` असं म्हणत राज ठाकरेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली...
विरोधी पक्षाच्या आमदारांवरच कारवाई करणं, अयोग्य असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.याशिवाय अर्थसंकल्पात अडचण नको, म्हणून सरकारने सत्ताधारी आमदारांवर कारवाई केली नसल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला आहे. राज सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. वाशिम येथे बोलताना त्यांनी निलंबनाविषयी आपली प्रतिक्रिया दिली.

आमदारांनी केलेल्या नाराजीवर राज ठाकरेही संतापले होते. पोलिसांना मारहाण कोणीही करू नये असा आदेशच राज ठाकरेंनी दिला होता. मात्र या मारहाण प्रकरणात मनसे आमदार राम कदम यांचा सहभाग असल्याचे दिसून आले. त्यामुळे `माझ्या आमदारावर कारवाई झाली तरी चालेल.` असं म्हणत राज ठाकरेंनी पोलिसांच्या बाजूने ठाम भूमिका घेतली होती.