www.24taas.com, मुंबई
गेल्या एका दशकात फक्त महाराष्ट्रात १४ दहशतवादी हल्ले झाले. त्यामुळे आपण किती सुरक्षित आहोत? असा प्रश्न नेहमीच नागरिकांना सतावत असतो. एक नजर टाकूया गेल्या दहा वर्षांमधल्या दहशतवादी कारवायांवर...
* २ डिसेंबर, २००२ - मुंबईतल्या घाटकोपर इथं बेस्ट बसमध्ये बॉम्बस्फोट : २ ठार, ४९ जखमी.
* ६ डिसेंबर २००२ - मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनमध्ये बॉम्बस्फोट : २२ जखमी
* २७ जानेवारी २००३ - मुंबईतल्या विलेपार्ले रेल्वे स्टेशनमध्ये बॉम्बस्फोट : ३० जखमी
* १३ मार्च २००३ - मुलुंडजवळ ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट : १३ ठार, ८० जखमी
* २९ जुलै २००३ - मुंबईतल्या घाटकोपरमध्ये बसमध्ये बॉम्बस्फोट : ३ ठार, ३० जखमी
* २५ ऑगस्ट २००३ - झवेरी बाजार आणि गेटवे ऑफ इंडियाजवळ बॉम्बस्फोट : ५५ ठार, १५० जखमी
* ३ मे २००६ - घाटकोपरमधील बॉम्बस्फोटात एक ठार
* ११ जुलै २००६ - लोकल ट्रेनमधील साखळी बॉम्बस्फोटांनी संपूर्ण मुंबई हादरली : १८९ ठार, १००० हून अधिक जखमी
* ८ सप्टेंबर २००६ - नाशिकमधल्या मालेगावात तीन बॉम्बस्फोट : ३१ ठार, ३१२ जखमी
* २९ सप्टेंबर २००८ - मालेगावातील भिकू चौकात बॉम्बस्फोट : ६ ठार, १०१ जखमी
* २६ नोव्हेंबर २००८ - मुंबईवर दहशतवादी हल्ला : १६६ जणांचा मृत्यू, ३०० जखमी
* १२ फेब्रुवारी २०१० - पुण्यातील जर्मन बेकरीत बॉम्बस्फोट : १७ ठार, ५४ जखमी
* १३ जुलै २०११ - झवेरी बाजारासह तीन ठिकाणी बॉम्बस्फोट : २१ ठार, १४० जखमी
.