नाशिककरांनी अनुभवला 'एअर शो'चा थरार

विमानांच्या चित्तथरारक कसरतीने नाशिककरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. येणाऱ्या काळात शस्त्रास्त्रयुक्त हेलिकॉप्टर वायुसेनेत दाखल होणार असल्याने हवादलाची ताकद वाढणार असल्याचं ब्रिगेडिअर संजीव रैना सांगितलं आहे.

Updated: Nov 4, 2011, 04:18 PM IST

झी २४ तास वेब टीम, नाशिक 

 

नाशिकच्या गांधीनगर विमानतळावर साहसी एअर शोचा थरार नाशिककरांनी अनुभवला. आर्मी एव्हिऐशन कोर्सच्या सोळाव्या पदवीदान समारंभात ४२ अधिका-यांना  एव्हिऐशन विंगची पदवी देऊन गौरवण्यात आलं. यावेळी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन केलं, तर युद्धावेळी परिस्थितीचा कसा सामना करायचा  याची थरारक प्रात्यक्षिकं सादर केली. यावेळी हवाईदलाच्या चिता, ध्रुव, चेतक या हेलिकॉप्टर्सच्या चित्तथरारक कसरती सादर करण्यात आल्यात. तर संकटसमयी अडचणीत असणा-यांना कशी मदत कराली याचीही प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली.

 

विमानांच्या चित्तथरारक कसरतीने नाशिककरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. यावेळी बेस्ट कँडिडेट म्हणून निशांक पांडे याला चिता टॉफ्री देऊन गौरवण्यात आले. येणाऱ्या काळात शस्त्रास्त्रयुक्त हेलिकॉप्टर वायुसेनेत दाखल होणार असल्याने हवादलाची ताकद वाढणार असल्याचं ब्रिगेडिअर संजीव रैना सांगितलं आहे.