मराठा आरक्षणाबाबत बैठक पण, धनगर आणि मुस्लिम आरक्षणाचं काय?

धनगर - मुस्लिम समाजाची आरक्षणे सरकारला द्यायची नाहीत, असा आरोपही जलील यांनी केला

Updated: Jul 29, 2018, 08:46 AM IST
मराठा आरक्षणाबाबत बैठक पण, धनगर आणि मुस्लिम आरक्षणाचं काय? title=

मुंबई: मराठा आरक्षणाबाबत सरकार बैठक घेत आहे. मात्र धनगर आणि मुस्लिम आरक्षणाचं काय असा सवाल, एम आय एम चे आमदार इम्तियाज जलील यांनी केलाय. शिक्षण क्षेत्रात मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं जाण्याचा मुद्दा न्यायालयानंही मान्य केला होता. तरी सरकार ते का देत नाही असा प्रश्नही इम्तियाज जलील यांनी विचारलाय.

कोर्टाने मान्य केलेले आरक्षण का देत नाही?

मराठा आरक्षणबाबत तुम्ही बैठक घेत आहात. आयोगाचा अहवाल योग्य - अचूक असावा. लवकरात लवकर न्यायालयात दाखल व्हावा अशी तुम्ही मागणी करत आहात मग धनगर आणि मुस्लिम आरक्षणचे काय? शिक्षण क्षेत्रात मुस्लिम समाजाचा आरक्षण कोर्टाने मान्य केले होते,  ते तुम्ही का देत नाही?, असा सवाल इम्तियाज जलील यांनी विचारला आहे.

सरकारला आरक्षणच द्यायचे नाही

सरकारच्या मनात असेल तरच ही आरक्षणे लागू होतील. मराठा समजाबद्दल सरकार प्रयत्न करत आहे, मात्र धनगर - मुस्लिम समाजाची आरक्षणे सरकारला द्यायची नाहीत, असा आरोपही जलील यांनी केला.