धावत्या लोकलसमोर आलेल्या कुत्र्याचा तरुणाने असा वाचवला जीव, थरकाप आणणारा व्हीडिओ

व्हायरल व्हीडिओत तरुणाने स्वत:च्या जीवाची बाजी लावत रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या कुत्र्याचा जीव (Man Saves Dog Life) वाचवलाय. 

Updated: Aug 16, 2022, 07:03 PM IST
धावत्या लोकलसमोर आलेल्या कुत्र्याचा तरुणाने असा वाचवला जीव, थरकाप आणणारा व्हीडिओ title=

मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) दररोज अनेक व्हीडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. असाच एक व्हीडिओ सध्या तु्फान व्हायरल झालाय. व्हायरल व्हीडिओत तरुणाने स्वत:च्या जीवाची बाजी लावत रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या कुत्र्याचा जीव (Man Saves Dog Life) वाचवलाय. हा व्हीडिओ मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील नक्की कुठल्या स्थानकावरचा आहे, हे समजू शकलेलं नाही. मात्र या तरुणाच्या धाडसाचं कौतुक केलं जातंय. (western railway young man getting down on railway track and save dog video gose viral on social media)

नक्की काय घडलं?

कुत्रा रेल्वे ट्रॅकवर चालत होता. समोरुन लोकल रेल्वे येत होती. प्लॅटफॉर्मवरील प्रवासी हा सर्व प्रकार पाहत होते. मात्र ट्रॅकवर जाऊन कुत्र्याला वाचवण्याची हिमंत कोणातच नव्हती.

त्याच वेळीस आपल्या जीवाची पर्वा न करता या गर्दीतील एका तरुणाने ट्रॅकवर उडी घेतली. तर दुसऱ्या बाजूला लोकलसमोर कुत्रा असल्याचं मोटरमॅनच्या लक्षात आलं. त्याने प्रसंगावधान दाखवत रेल्वेचा वेग कमी केला. तर तरुणाने कुत्र्याला ट्रॅकवरुन उचललं आणि  सहप्रवाशांच्या मदतीने त्याला प्लॅटफॉर्मवर ठेवलं. 

यानंतर तो तरुण स्वत: प्लॅटफॉर्मवर आला. तर दुसऱ्या बाजूला थांबलेली लोकल निघून गेली. हा व्हीडिओ नक्की कुठल्या स्थानकावरचा आहे, याची खात्री नाही.

तरुणाचं कौतुक 

दरम्यान या तरुणाने दाखवलेल्या हिमंतीसाठी त्याचं कौतुक केलं जातंय. तसेच काही नेटकऱ्यांनी यासाठी मोटरमॅनचंही कौतुक केलंय. या व्हीडिओवरुन समाजात अजूनही चांगली माणसं आहेत, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.