टीना दाबी यांची बहीण सुद्धा IASअधिकारी..सुंदरतेलाही नाही तोड

 टीना डाबी यांची लहान बहीण रिया दाबी हिनेही यूपीएससी उत्तीर्ण केली आहे. सौंदर्याबद्दल बोलायचे झाले तर रिया टीनापेक्षा काही कमी सुंदर नाही. 

Updated: May 20, 2022, 06:45 PM IST
टीना दाबी यांची बहीण सुद्धा IASअधिकारी..सुंदरतेलाही नाही तोड title=

मुंबईः IASअधिकाी टीना दाबी यांच्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. मात्र टीना यांची लहान बहीण रिया डाबी हिनेही यूपीएससी उत्तीर्ण केली आहे. सौंदर्याबद्दल बोलायचे झाले तर रिया टीनापेक्षा काही कमी सुंदर नाही. रिया डाबी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

यूपीएससी परीक्षेत टॉपर टीना डाबीचे दुसरे लग्न नुकतेच पार पडलं. या लग्नाचीही जोरदार चर्चा झाली. टीना डाबी यांची धाकटी बहीण रिया डाबी देखील आयएएस अधिकारी असून सौंदर्यात मोठ्या बहिणीपेक्षा कमी नाही. रिया डाबी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमुळे चर्चेत असते.

आयएएस टीना डाबी सोशल मीडियापासून दूर आहेत. पण बहीण रिया दाबी सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असल्याचे दिसते.

समुद्राच्या लाटांचा आनंद लुटताना रियाने अनेक फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये रिया खूपच क्यूट दिसत आहे. त्याच्या या पोस्टवर चाहते उत्स्फूर्त कमेंट करत आहेत आणि कौतुक करत आहेत.

रिया डाबीचा जन्म 1998 मध्ये भोपाळमध्ये झाला. जेव्हा तिची मोठी बहीण टीना 7 व्या वर्गात होती, तेव्हा तिचे संपूर्ण कुटुंब दिल्लीला स्थलांतरित झाले आणि पुढील शिक्षण दोन्ही बहिणींनी दिल्लीतून केले. रियाने तिचे शालेय शिक्षण दिल्लीच्या कॉन्व्हेंट जीसस अँड मेरी स्कूलमधून पूर्ण केले. यानंतर तिने डीयूच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून राज्यशास्त्रात बीए केले आणि आयएएस परीक्षेची तयारी सुरू केली.

टीना आणि रिया डाबी यांचे वडील जसवंत दाबी हे बीएसएनएल दिल्लीमध्ये महाव्यवस्थापक आहेत. त्याचबरोबर आई हिमानी दाबी या भारतीय अभियांत्रिकी सेवेच्या माजी अधिकारी आहेत.  रिया अनेकदा तिच्या मैत्रिणींसोबत व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे.

रिया डाबी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे फोटो व्हिडिओ शेअर करत असते. इंस्टाग्रामवर रियाचे 374kफॉलोअर्स आहेत.