Chhatrapati Shivaji Maharaj Talwar In England : शिव प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. ब्रिटनमध्ये असेलली छत्रपती शिवाजी महाराजांची ( Chhatrapati Shivaji Maharaj) पूजेची जगदंबा तलवार (Jagdamba Sword ) तलवार महाराष्ट्रात परत आणली जाणार आहे. शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) यासाठी प्रयत्न करत आहे. याकरिता ब्रिटन सरकारशी पत्रव्यवहार सुरु असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (State Culture Minister Sudhir Mungantiwar) यांनी दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार ही इतिहासाची साक्षिदार आहे. सध्या ही तलवार ब्रिटनमध्ये आहे. ही तलवार परत भारतात आणण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार विशेष प्रयत्न करत आहे. शिवराज्यभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याआधी ही तलवार महाराष्ट्रात परत आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ऋषी सुनक(Rishi Sunak) ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना तलवार परत मिळवण्याबाबत विनंती केली जाणार आहे. इंग्रजही तलावर घेऊन गेले होते. जगातील सर्व संपत्ती पेक्षा ही तलावर अमूल्य असल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
ही तलावर ब्रिटनमधून परत आणण्यासाठी सांस्कृतिक विभागामार्फत पत्रव्यवहार केला जाणार आहे. 2024 मध्ये शिवराज्यभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होणार आहेत. यानिमित्ताने महाराष्ट्रात विशेष कार्यक्रमक आयोजीत केला जाणार आहे. या कार्यक्रमात ही तलवार ठेवली जाईल. यामुळे ही तलवार परत मिळाल्यास आनंद द्विगुणीत होईल असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
जगदंबा तलवार जुनी युरोपियन एकपाती, सरळ तलावर आहे. या तलवारीच्या दोन्ही बाजूला दोन खोबणी असून एकामध्ये IHS असं तीन वेळा कोरलंय. तलवारीची मूठ लोखंडी असून त्याला गोलाकार परज आहे. मुठीजवळ सोन्याच्या फुलांचं नक्षीकाम, मोठे हिरे आणि माणिक जडविले आहेत. ही तलवार मराठ्यांचे प्रमुख शिवाजी यांची निशाणी आहे, असा उल्लेखही करण्यात आला आहे.
जगदंबा तलवार देशात परत आणण्यासाठी अनेक प्रयत्नही झाले होते. मात्र त्याला यश आलं नाही. दीडशे वर्षांच्या राजवटीत ब्रिटिशांनी भारतातल्या अनेक ऐतिहासिक वस्तू इंग्लंडला नेल्या. यातल्या काही भेट म्हणून दिल्या गेल्या होत्या तर काही चक्क लुटून नेल्या होत्या. यातली सर्वात अनमोल आहे ती मराठी अस्मितेचा मानबिंदू असलेल्या शिवरायांची जगदंबा तलवार.
‘ऑक्टोबर 1875’ मध्ये प्रिन्स ऑफ वेल्स भारतभेटीवर आला होते. भारतातील राजेरजवाड्यांनी अत्यंत मौल्यवान वस्तू भेटस्वरूपात दिल्या. कोल्हापूरच्या राजगादीवर तेव्हा ‘छत्रपती शिवाजी महाराज चौथे’ विराजमान होते. त्यांनीच ही तलवार भेट म्हणून दिल्याचे इतिहास तज्ञ सांगतात. ही, तलवार जर महाराष्ट्रात परत आली तर ती ख-या अर्थानं महाराजांना आदरांजली ठरेल.