ओखीचा तडाखा; अनेक ठिकाणी शेत पिकांना फटका, शेतकरी हैराण

ओखी वादळाचा मनमाडला जोरदार फटका बसलाय. सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह पाऊस सुरु आहे. अचानक आलेल्या पावसामुळे पिकांना मोठा फटका बसतोय.

Updated: Dec 5, 2017, 12:46 PM IST
ओखीचा तडाखा; अनेक ठिकाणी शेत पिकांना फटका, शेतकरी हैराण title=

मुंबई : ओखी वादळाचा मनमाडला जोरदार फटका बसलाय. सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह पाऊस सुरु आहे. अचानक आलेल्या पावसामुळे पिकांना मोठा फटका बसतोय.

अचानक वातावरण बदलामुळे पिकांचे नुकसान

वातावरणातील या बदलामुळे गहू, हरभरा, द्राक्ष आणि डाळिंब बागांचं नुकसान होणार आहे. तसंच पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढणार आहे. काढणीला आलेला लाल कांदा आणि लागवड झालेल्या कांद्यावर या पावसाचा परिणाम होण्याचा धोका आहे. कांद्याची रोपंही खराब होण्याची भीती व्यक्त होतेय. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतक-यांची तारांबळ उडालीय. 
ओखी वादळाचा मनमाडला जोरदार फटका बसलाय. सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह पाऊस सुरु आहे. 

शेतकऱ्यांची उडाली तारांबळ

मनमाड, कळवण, देवळा, सटाणा आणि मालेगावच्या अनेक भागात पावसानं हजेरी लावलीय. अचानक आलेल्या पावसामुळे पिकांना मोठा फटका बसतोय. वातावरणातील या बदलामुळे गहू, हरभरा, द्राक्ष आणि डाळिंब बागांचं नुकसान होणार आहे. तसंच पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढणार आहे. काढणीला आलेला लाल कांदा आणि लागवड झालेल्या कांद्यावर या पावसाचा परिणाम होण्याचा धोका आहे. कांद्याची रोपंही खराब होण्याची भीती व्यक्त होतेय. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतक-यांची तारांबळ उडालीय.

मुंबईसह उपनगरांत पाऊस आणि ढगाळ वातावरण

आज सकाळपासून मुंबईसह कोकणात ढगाळ वातावरण आहे. अनेक ठिकाणी पावसाच्या धाराही बरसत आहेत. सकाऴी रत्नागिरीच्या सागरी किनाऱ्यावर समुद्र खवळलेला बघायाला मिळतोय. रात्री रिमझिम पाऊस झाला. पण सकाळापासून पावसानं विश्रांती घेतलीय..पण ढगाळ वातावरण आहे. इकडे नवी मुंबईत सकाळपासून दमदार पावसानं हजेरी लावली. वसई विरारमध्येही पावसानं हजेरी लावली.  ओखी वादळाचा धोका लक्षात घेता आज वसई विरार परीसरातील सर्व शाळाना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. पण सकाळीपासून सुरू असणाऱ्या कामावर जाणा-यांचे मोठे हाल झाले. वातावरणात गारवा आला आहे.

कोकणात समुद्र खवळला, सतर्कतेचा इशारा

ओखी चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावलीय. जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय. काही भागात मुसळधार पाऊस कोसळलाय. सध्या पाऊस थांबला असला तरी जोरदार वारे वाहतायत. या वातावरणामुळे पर्यटनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होतेय. सुरक्षित मानल्या जाणाऱ्या देवगड बंदरात सोमवारी दिवसभरात गुजरात हुन 220 नौका दाखल झाल्यात. अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे बोटींची संख्या मोजण्यात व नोंद घेण्यात अडचण येत आहे. त्यामुळे पहाणी करता जिल्हाधिकारी उदय चौधरी येणार आहेत...श्री क्षेत्र कुणकेश्वर समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षिततेचा उपाय म्हणून समुद्रात जाण्यास देवस्थान ट्रस्टकडून मनाई करण्यात आलीय.